आता सहज उघडता येईल पेट्रोल पंप, मोदी सरकारने बदलले पेट्रोल, डिझेल विकण्याचे नियम 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पेट्रोल आणि डिझेल च्या मार्केटिंग मध्ये खाजगी क्षेत्राची गुंतवणूक वाढविण्यासाठी मोदी सरकारने नैसर्गिक तेलाच्या मार्केटिंगमधील दिशानिर्देश सोपे केले आहेत. पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयानुसार, पेट्रोल आणि डिझेल यांच्या रिटेल ऑथोरायझेशन साठी एका फर्मला कमीतकमी १०० रिटेल आउटलेट्स उघडावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना किमान नेटवर्थ २५० कोटी रुपये असणे गरजेचे असणार आहे. आणि ज्या फर्म रिटेल आणि बल्क अशा दोन्हीसाठी लायसन्स मागत आहेत त्यांना अर्ज करताना नेटवर्थ ५०० कोटी रुपये असावे लागणार आहे. आधीचे कडक नियम हटवून पेट्रोलियम उत्पादकांसाठी मार्केटिंग सेक्टर उघडला असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे देशातील इंधन तेलाच्या बाजारात क्रांती आणली जाऊ शकते असे देखील सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे आता तुम्हाला सहज पेट्रोल पंप उघडता येणार आहे. तुमच्याकडे अधिक पैसे नसतील पण जमीन असेल तरी तुम्ही पेट्रोल पंप साठी अर्ज करू शकता. 

पेट्रोलियम तथा गॅस मंत्रालयाने नोव्हेंबर २०१९ ला उदारीकृत लायसन्स व्यवस्थेवर एक वक्तव्य करत २५० कोटी  पर्यंत नेटवर्थ पेट्रोल, डिझेल विक्रीसाठी लायसन्स मागू शकतात असे सांगितले होते. तसेच रिटेल आणि बल्क दोन्हीचा परवाना हवा असेल तर ५०० कोटी नेटवर्थ लागेल असेही सांगण्यात आले होते. यासंदर्भात आता सरळ मंत्रालयाला अर्ज करता येणार आहे. या अधिसूचनेनुसार या कंपन्यांचे परिचलन सुरु झाल्यावर कमीतकमी ३ वर्षाच्या आत एक वैकल्पिक इंधन सीएनजी, एलएनजी अथवा जैव ईंधन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधाना लावणे अनिवार्य असणार आहे. विक्रेत्यांना ५ वर्षात कमीतकमी ५% विक्री केंद्रे ग्रामीण भागात स्थापित करावे लागणार आहेत. आतापर्यंत भारत पेट्रोलियम उत्पादनांचे मार्केटिंग तेल कंपन्यांकडून करत आहेत. यामध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड,  नुमालीगढ़ रिफाइनरी लिमिटेड, मैंगलोर रिफाइनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड, भारत ओमान रिफाइनरीज़ लिमिटेड आणि काही खाजगी कंपन्यांचा समावेश आहे. 

पेट्रोल पंप उघडण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. वय २१ ते ६० च्या दरम्यान असले पाहिजे. किमान १० वि पर्यंतचे शिक्षण गरजेचे आहे. स्टेट अथवा नॅशनल हायवेवर १२०० ते १६०० वर्गमीटर जमीन असणे आवश्यक आहे. शहरी भागात जर पेट्रोल पंप काढायचा आहे तर किमान ८०० वर्गमीटर जागा गरजेची आहे. स्वतःच्या नावावर नसेल तरी जमीन लीज वर घेता येऊ शकते. त्याची कागदपत्रे तुम्हांला दाखवावी लागतील. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जमीन असेल तरी डिलरशिप साठी सर्ज करता येऊ शकतो. कृषी जमीन असेल तर तिचे कन्व्हर्जन करावे लागेल. प्रॉपर्टीच्या नकाशासहित जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे, एनओसी कंपनी अधिकारी निरीक्षणाच्या वेळी बघतात. तुमच्याकडे अधिक पैसे नाही आहेत आणि नावावर जमीन आहे तरी तुम्ही पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकता. नवीन मार्गदर्शिकेत पंप आवेदनकर्ता जवळ फंड असण्याची आवश्यकता नाही आहे. याशिवाय जमीन मालकीच्या हक्कांवरही सूट देण्यात आली आहे. आतापर्यत शहरी भागातील पेट्रोल पंपासाठी २५ लाख रुपये तर ग्रामीण भागातील पेट्रोल पंपासाठी १२ लाख रुपये डिपॉझिट गरजेचे होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment