आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरी करत असलेल्यांना आता ऑफिस मध्ये अधिक वेळ घालवायाची तयारी करावी लागू शकते. कारण भारत सरकार कामकाजाची वेळ दिवसाच्या ८ तासांवरून १२ पर्यंत वाढवण्याचा विचार करीत आहे.हा लॉकडाउन २ चा परिणाम असू शकतो. भारतात लॉकडाऊनमुळे सध्या मजुरांची कमतरता भासत आहे,त्यामुळे दररोजच्या मालाची मागणी वेगाने वाढली आहे. म्हणूनच सरकार त्यात बदल करण्याचा विचार करीत आहे. यासंदर्भात १९४८ च्या कायद्यातील बदल विचाराधीन आहे.

आता काय होईल- इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार नवीन अध्यादेशामुळे राज्य सरकारांना कर्मचार्‍यांचे कामकाजाचे तास वाढविण्याची मुभा देण्यात येईल. कायद्यात नवीन बदल कंपन्यांना शिफ्ट वाढविण्याचा अधिकार देतील. सध्या, दररोज ८ तासांची शिफ्ट आहे.आठवड्यातून फक्त सहा दिवस (किंवा ४८ तास) काम केले जाऊ शकते. जर हा प्रस्ताव निश्चित झाला तर दररोजची ही शिफ्ट १२ तासांची असेल.आठवड्याच्या सहा दिवसांपर्यंत (७२ तास) कामाची परवानगी असेल. यासाठी १९४८ च्या फॅक्टरीज अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करावी लागेल.

साध्याचा कायदा, १९४८ च्या कायद्याच्या कलम ५१ मध्ये असे म्हटले आहे की कोणत्याही प्रौढ व्यक्तीस कारखान्यात काम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. तसेच, कोणत्याही आठवड्यात ४८ तासांपेक्षा जास्त काम केले जाऊ शकत नाही.असे का? इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात असे म्हटले आहे की कर्मचारी संघटना आणि उद्योग यांनी कामगार कमी पडल्यानंतर हि समस्या सोडविण्यात मदत होईल म्हणून कामकाजाचे तास वाढवण्याची विनंती केली आहे. बरेच कामगार आपल्या घरी परत गेले आहेत आणि ते त्वरित कामावर येऊ शकणार नाहीत.


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment