सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती न वाढल्याने सर्वसामान्यांना दिलासा! जाणून घ्या नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींदरम्यान सलग दुसर्‍या दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बुधवारी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. यानंतर राजधानी दिल्लीत एका लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला 80.43 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, एक लिटर डिझेलची किंमत ही 80.53 रुपये असेल. राजधानी दिल्लीशिवाय देशातील इतर तीन मोठ्या शहरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ दिसून आलेली नाही.

आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
तुम्हाला एसएमएसद्वारेही पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 वर तर बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 वर पटवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहक हे HPPrice लिहून 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

आज देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलनवे दर काय आहेत ते जाणून घ्या

दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि 80.53 रुपये लिटर आहे.
मुंबई – पेट्रोलची किंमत 87.19 रुपये आणि डिझेलची किंमत 78.83 रुपये आहे.
कोलकाता – पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझेल 75.64 रुपये आहे.
चेन्नई – पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेलची किंमत 77.72 रुपये आहे.

नोएडा- पेट्रोल 81.08 रुपये तर डिझेल 72.59 रुपये आहे.
गुरुग्राम – पेट्रोल 78.64 रुपये तर डिझेल 72.77 रुपये आहे.
लखनऊ – पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल 72.49 रुपये आहे.
पटना- पेट्रोल 83.31 रुपये तर डिझेल 77.40 रुपये आहे.
भोपाळ- पेट्रोल 88.08 रुपये तर डिझेल 79.95 रुपये आहे.
जयपूर- पेट्रोल 87.57 रुपये आणि डिझेल 81.32 रुपये आहे.
चंदीगड – पेट्रोल 77.41 रुपये तर डिझेल 71.98 रुपये आहे.

दररोज सकाळी 6 वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर हे सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. गेल्या 23 दिवसात पेट्रोलची किंमत 9.17 रुपयांनी तर डिझेलची किंमत 10.90 रुपयांनी वर गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment