पेट्रोल-डिझेल बरोबर सामान्य नागरिकांवर आता गॅस सिलिंडर दरवाढीचा बोजा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या २२ दिवसांपासून तेल विपणन कंपन्या केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवत आहेत. मात्र आता तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्यानं महागाई स्वयंपाकघरात पोहोचली आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) एलपीजी सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर) च्या अनुदानात वाढ केली आहे. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता नवीन दर ५९४ रुपयांवर पोहोचले आहेत.

IOC वेबसाइटवर दिलेल्या किंमतीनुसार दिल्लीतील सिलिंडरच्या किंमतीत १ रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ५९३ रुपयांवरून ५९४ रुपयांवर गेली आहे. दिल्ली सहित देशातील इतर शहरांमध्येही आजपासून देशांतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत.

दरवाढीनंतर कोलकातामध्ये ४ रुपये, मुंबईत ३.५० आणि चेन्नईत ४ रुपये एलपीजी गॅस सिलिंडर महाग झाले आहेत. मात्र, १९ किलो सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. दरम्यान, जूनमध्ये दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ११.५० रुपयांनी वाढ झाली. त्याच वेळी मे महिन्यामध्ये ते १६२.५० रुपयांनी स्वस्त झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment