ट्रेनच्या Confirm Ticket वरही बदलले जाऊ शकते प्रवाशाचे नाव, करावे लागेल ‘हे’ काम 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वस्त आणि आरामदायक प्रवासामुळे ट्रेनचा प्रवास साऱ्यांनाच आवडतो. कधी कधी या प्रवासात काही कारणाने बाधा येते. जसे की एखाद्या वेळेला एखाद्याच्या नावाने तिकीट काढले आणि ऐनवेळी त्याचे येणे रद्द झाले तर त्या तिकिटावर दुसऱ्या एखाद्याला प्रवास करणे अवघड होऊन जाते. सामान्यतः अशा परिस्थितीत प्रवासी प्रवास रद्द करतात अथवा तिकीट कॅन्सल करून टाकतात. पण भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगनंतर एकदा नाव बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

तिकीट बुकिंगच्या वेळी प्रवाशाचे चुकीचे नाव नोंद झाल्याची काही प्रकरणे बऱ्याचदा समोर आली आहेत. अनेकदा प्रवाशांना आपल्या जागी परिवारातील दुसऱ्या एखाद्या सदस्याला प्रवास करावयाचा असल्यास याचा वापर करता येऊ शकतो. आयआरटीसी तिकिटावर प्रवाशाचे नाव बदलण्याची सुविधा देते. त्यासाठी बुकिंगच्या प्रिंट आऊट घेऊन जावे लागते. ही प्रिंट आऊट आपल्या भागाच्या रिझर्व्हेशन काउंटर वर घेऊन जायची असते.

ज्या व्यक्तीचे नाव तिकिटावर घ्यायचे आहे त्याचे ओळखपत्र आणि ओळखपत्राची झेरॉक्स सोबत नेणे आवश्यक आहे. रिझर्व्हेशन काउंटर वर कागदपत्रे तपासून नावात बदल करून दिला जातो. ट्रेन निघण्याच्या २४ आधीपर्यंत नाव बदलवून घेता येते. कन्फर्म तिकीट आई-वडील, बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी, पती-पत्नी यांच्या नावावर बदलून दिले जाऊ शकते. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, राशन कार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, फोटोसहित क्रेडिट कार्ड, वैध विद्यार्थी ओळखपत्र यापैकी काहीही ओळखपत्र म्हणून चालते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment