आधारमध्ये जन्म तारीख अपडेट करण्यासाठी ‘या’ डॉक्युमेंटसची असेल आवश्यकता, UIDAI ने जारी केली लिस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । UIDAI ने आधार कार्डधारकांना महत्वाची माहिती दिली आहे. जर आपण आपल्या आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलू इच्छित असाल किंवा घराचा पत्ता अपडेट करू इच्छित असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आजकाल आधारचा वापर बँक खाते बनवण्यापासून ते पासपोर्ट तयार करण्या पर्यंत सर्वत्र केला जातो. तर अशातच जर चुकीची जन्मतारीख किंवा चुकीचा पत्ता असेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, म्हणूनच जर तुमच्या आधारामध्ये काही गडबड असेल तर ती दुरुस्त करा. DOB अपडेट करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे त्या कागदपत्रांची लिस्ट UIDAI कडून जाहीर केली गेली आहे – चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात

UIDAI ने ट्विट केले

आधार जारी करणारी संस्था यूआयडीएआयने आपल्या ट्विटमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की जर तुम्हाला आधारमध्ये आपली जन्मतारीख अपडेट करायची असेल तर आपण वापरत असलेला डॉक्युमेंट आपल्या नावाचा असेल आणि तो वैध असेल याची खात्री करा.

हे डॉक्युमेंटस स्वीकारले जातात 

यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, ते आधारमधील Proof Of Identity साठी 32 डॉक्युमेंटस स्वीकारले जातात. Proof Of relationship साठी 14 डॉक्युमेंटस स्वीकारतात, DOB साठी 15 आणि Proof of Address (PoA) 45 डॉक्युमेंटस स्वीकारले जातात. डॉक्युमेंटसची लिस्ट तपासूयात-

DOB Documnets

  1. बर्थ सर्टिफिकेट

  2. पासपोर्ट

  3. पॅन  कार्ड

  4. मार्क शीट्स

  5. SSLC बुक/सर्टिफिकेट

Proof Of Identity (PoI)

  1. पासपोर्ट

  2. पॅन कार्ड

  3. रेशन कार्ड

  4. वोटर आयडी

  5.  ड्रायव्हिंग लायसन्स

Proof of Address (PoA)

  1. पासपोर्ट

  2. बँक स्टेटमेंट

  3. पासबुक

  4. रेशन कार्ड

  5. पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट

  6. वोटर आयडी

  7. ड्रायव्हिंग लायसन्स

  8. वीज बिल

  9. पाणी बिल

व्हॅलिड डॉक्युमेंट्स नसल्यास हे काम करेल

यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांच्या नावावर स्वत:चे कोणतीही व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाहीत, ते आधार इनरॉलमेंट / नाव, पत्ता, जन्मतारीख अपडेट  करण्यासाठी यूआयडीएआय कडून अप्रुव्हड स्टॅण्डर्ड सर्टिफिकेट वापरू शकतात. सर्टिफिकेट ग्रुप A  किंवा B  गॅझेटेड अधिकारी / ग्रामपंचायत प्रमुख किंवा प्रमुख / खासदार / आमदार / एमएलसी / नगरसेवक / तहसीलदार / मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमुख किंवा अधीक्षक किंवा वॉर्डन किंवा मॅट्रॉन / संस्था मान्यताप्राप्त शेल्टर होम किंवा अनाथाश्रम च्या प्रमुखांकडून जारी केले जाणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment