पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा ! आजचे नवीन दर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर अनेक दिवसांपासून निरंतर वाढत होते, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढतच गेल्या. पण गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न केल्याने त्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी असलेल्या आयओसीने आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. त्यामुळे राजधानी दिल्लीत एका लिटर पेट्रोलची किंमत ही 80.43 रुपये झाली तर त्याचवेळी एक लिटर डिझेलसाठी ही किंमत 80.53 रुपये आहे.

दररोज सकाळी 6 वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूट, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या.

दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि 80.53 रुपये लिटर आहे.
मुंबई – पेट्रोलची किंमत 87.19 रुपये तर डिझेलची किंमत 78.83 रुपये आहे.
कोलकाता – पेट्रोल 82.10 रुपये तर डिझेल 75.64 रुपये.
चेन्नई – पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेलची किंमत 77.72 रुपये आहे.
नोएडा- पेट्रोल 81.08 रुपये तर डिझेल 72.59 रुपये आहे.
गुरुग्राम – पेट्रोल 78.64 रुपये तर डिझेल 72.77 रुपये आहे.
लखनऊ – पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल 72.49 रुपये आहे.
पटना- पेट्रोल 83.31 रुपये तर डिझेल 77.40 रुपये आहे.
भोपाळ- पेट्रोल 88.08 रुपये तर डिझेल 79.95 रुपये आहे.
जयपूर- पेट्रोल 87.57 रुपये आणि डिझेल 81.32 रुपये आहे.
चंदीगड – पेट्रोल 77.41 रुपये आणि डिझेल 71.98 रुपये आहे.

आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
तुम्हाला एसएमएसद्वारेही पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे कस्टमर RSP 9224992249 वर लिहून तर बीपीसीएल कस्टमर RSP लिहून 9223112222 नंबर वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएलचे कस्टमर HPPrice लिहून 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment