Sunday, June 4, 2023

या सुंदर फोटोत 99 टक्के लोकांना दिसले 5 घोडे; पण आहेत त्याहून जास्त…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया सध्याच्या काळात टाईमपास बनला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. सध्या असाच एक भन्नाट फोटो व्हायरल होत असून या फोटोमध्ये अनेक घोडे दिसत आहेत. लोकांना हे घोडे शोधण्याचं चॅलेंज देण्यात आले आहे. हा फोटो ऑप्टिकल इल्यूजनचं भन्नाट उदाहरण आहे. घोड्यांच्या या फोटो सहज पाहिले तर 5 घोडे दिसत आहेत. पण त्याहूनही जास्त आहेत. अगदी काळजीपूर्वक पाहिल्यानंतरही लोकांना या चित्रात नेमके किती घोडे आहेत? याचं उत्तर सापडत नाही.

संबंधित घोड्यांचा फोटो हा किड्स एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थ या अमेरिकन साइटवर अपलोड करण्यात आला आहे. फोटोसोबत नागरिकांना, त्यात किती घोडे आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. मात्र, या फोटोकडे काळजीपूर्वक पाहिलं की जास्त गोंधळ उडत आहे. 99 टक्के लोकांना या फोटोमध्ये पाच घोडे दिसत आहेत पण, हे उत्तर चुकीचं आहे.

photo horses

विशेष म्हणजे हा फोटो 1970 च्या दशकापासून प्रेक्षकांना गोंधळात टाकत आहे. या चित्रामध्ये किती घोडे आहेत हे ओळखायचे आहे. कितीही वेळा घोडे मोजले तरीही त्याचे ठोस उत्तर मिळत नाही. बेव्ह डूलिटील या कलाकाराने हे तयार केले आहे. फोटोसोबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तरही वेबसाइटवर देण्यात आले आहे.

Kids Environment Kids Health

‘हे’ आहे खरे उत्तर

किड्स एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थच्या माहितीनुसार, घोड्यांच्या चित्रात एकूण 7 घोडे लपलेले आहेत. यापैकी पाच घोडे स्पष्ट दिसत आहेत, तर इतर दोघांपैकी एकाचं डोके आणि एकाचं शरीर दिसत आहे. अशाप्रकारे एकूण 7 घोडे यामध्ये लपलेले आहेत. वेबसाइटनुसार, जर तुम्हाला त्यात 7 घोडे दिसले तर समजून जा की तुम्ही खूपच हुशार ठरणार आहात.