Finn Allen ची वादळी खेळी; 16 Six मारत ठोकले ऐतिहासिक शतक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या T -20 सामन्यात न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर फिन अलेन (Finn Allen Century) याने अवघ्या 62 चेंडूत 137 धावांची ऐतिहासिक खेळी केली. यावेळी त्याने तब्बल 16 सिक्स आणि 5 चौकार मारले. फिन ऍलनच्या या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडने 20 षटकात 224-7 असा धावांचा डोंगर उभारला. ऍलन व्यतिरिक्त सेल्फर्ट 31 आणि फिलिप ने 19 धावा काढल्या. तर पाकिस्तान कडून हॅरिस रूफ ने सर्वाधिक 2 बळी घेतले.

पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदी (Shahin Afridi) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय संघाच्या चांगलाच अंगलटि आला. कारण सलामीला आलेल्या फिन ऍलनने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्लाबोल केला. 24 वर्षीय ऍलनने अवघ्या 48 चेंडूत विक्रमी शतक झळकावले. सुरुवातीपासूनच त्याने सर्वच पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. ऍलनने 62 चेंडूत 137 धावांची वादळी खेळी करताना 16 गगनचुंबी षटकार आणि 5 चौकार लगावले. अॅलनने शाहीन आफ्रिदीपासून मोहम्मद वसीम ज्युनिअरपर्यंतच्या प्रत्येक गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला.

न्यूझीलंड कडून तिसरे जलद शतक

एलेनचे शतक हे T -20 फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूने केलेले तिसरे जलद शतक आहे. यापूर्वी कॉलिन मुनरो (37 चेंडू) आणि ग्लेन फिलिप्स (46 चेंडू) यांनी जलद शतक लगावले होते. फिन अॅलनचे हे त्याच्या टी-20 कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली होती.

पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली

न्यूझीलंडच्या 224 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी चांगलीच कोसळली. पाकिस्तनाकडून बाबर आझमने सार्वधिक 58 धावा केल्या. तर सैम अयुब, मोहम्मद रिझवान, फखर जमन स्वस्तात बाद झाले. आत्ता चालू सामन्यात पाकिस्तानचा स्कोर 17 ओव्हर पर्यंत 149-7 असा असून पाकिस्तान पराभवाच्या छायेत आहे.