सोनू निगमवर FIR दाखल; पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?

Sonu Nigam FIR
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मु काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याबाबत (Pahalgam Terror Attack) वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायक सोनू निकम (Sonu Nigam) याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. बेंगलुरू येथील कॉन्सर्टदरम्यान कन्नड भाषेच्या मागणीवर सोनू निगम यांनी पहलगाम हल्ल्याशी संबंध जोडला.. यानंतर कर्नाटक रक्षणा वेदिके (KRV) या कन्नड समर्थक संघटनेने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोनू निगमच्या या वक्तव्यानंतर कन्नड समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याच बोललं जातंय.. खरं तर सोनू निगम म्हणजे आपल्या आवाजातून चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा महान गायक म्हणून ओळखला जातो. परंतु आता तोच अडचणीत आला आहे.

नेमकं काय घडलं?

बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगम गाणी गात होता. तेव्हा एक चाहत सतत गायकावर कन्नडमध्ये गाणं गाण्यासाठी दबाव टाकत होता.चाहता धमकी देत ​​असल्याने सोनूने ही मागणी नाकारली. यानंतर, त्याने जे काही सांगितले त्यामुळे वाद निर्माण झाला. सोनू म्हणाला कि, पहलगाममध्ये जे काही घडले ते हेच कारण आहे… म्हणूनच तू जे केले ते करत आहेस.’ बघ तुझ्या समोर कोण उभा आहे असं विधान सोनू निगमने केलं.,… सोनूचे हे बोलणं कन्नड समुदायाला अपमानास्पद वाटलं. सोनू निगमने साध्या कन्नड गाण्याच्या मागणीचा संबंध पहलगाममधील दहशतवादी घटनेशी जोडल्याने कन्नड समुदाय नाराज झाला.

याच पार्श्वभूमीवर, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या बेंगळुरू जिल्हा युनिटने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. संघटनेने आरोप केला आहे की सोनूच्या विधानामुळे कन्नड समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या, भाषिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले आणि या प्रदेशात हिंसाचार भडकण्याची शक्यता निर्माण झाली. त’हे विधान केवळ असंवेदनशीलच नाही तर धोकादायक सुद्धा आहे. एका सांस्कृतिक मागणीला दहशतवादी घटनेशी जोडून, ​​सोनू निगमने कन्नड समुदायाला असहिष्णु म्हणून चित्रित केले, ज्यामुळे भाषिक द्वेष वाढला आणि जातीय सलोखा धोक्यात आला असेही या तक्रारीत म्हटले आहे