हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता छत्तीसगडमधील कोरबा या ठिकाणावरून विशाखापटनमला गेलेल्या कोरबा एक्सप्रेस या. ट्रेनमध्ये अचानक भीषण आग लागलेली आहे. या आगी नंतर तेथील सगळ्याच लोकांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे. ही ट्रेन कोरबावरून तिरूमलाला जात होती. त्या ठिकाणी एका एका स्टेशनवर ट्रेन थांबली. त्यानंतर स्टेशनच्या 4 नंबर प्लॅटफॉर्मवर ही आग लागलेली दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या आगीमध्ये 3 एसी बोगी पूर्णपणे जळालेले आहेत. परंतु सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नाही. B 7 बोगीच्या टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि त्यानंतर हा अपघात झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.
या रेल्वेमधून B 7 बोगी ही पूर्णपणे जळालेली आहे. तर B6 आणि M1 बोगीला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. या रेल्वेमध्ये सुदैवाने कोणतेही प्रवासी नसल्याने एक मोठी दुर्घटना होण्यापासून टळलेली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता वित्तहानी देखील कमीत कमी होण्याचा प्रयत्न लोकांकडून केला जात आहे. आपण रेल्वेमध्ये अशा घटना आजपर्यंत अनेकवेळा पाहिलेल्या आहेत. परंतु यावेळी रेल्वे मधील लोकांचे नशीब बलवत्तर होते. म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. आणि लागलेली आग देखील आटोक्यात आणण्याचा प्रयत्न रेल्वे अधिकारी करत आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. रेल्वे अधिकारी, सरकारी रेल्वे पोलीस, रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि 3rd AC (B-7) कोचच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि शहर पोलिसांचे अधिकारी व कर्मचारीही ठाण्यात दाखल झाले.
“ट्रेन सकाळी 6.30 वाजता आली आणि नंतर डब्यांच्या देखभाल डेपोवर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर थांबली. स्थानकावर गस्तीवर असलेल्या रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) कर्मचाऱ्यांना B-7 कोचमधून धूर येत असल्याचे दिसले आणि त्यांनी अग्निशमन दल आणि स्थानकाच्या कर्मचाऱ्यांना सावध केले. सकाळी 11.10 पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली आणि बाधित रेक प्रक्रियेनुसार बाहेर काढण्यात आला. आग कोचच्या शेवटच्या भागाला लागली. आगीचे कारण ओळखण्यासाठी चौकशीचे आदेश दिले जातील,” असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) सौरभ प्रसाद यांनी सांगितले.