मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग; दोघांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील मालाड परिसरात मोठी दुर्घटना घडली असून एका झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील मालाड पुर्व परिसरात जामरुशी नगर मध्ये आज सकाळी झोपडपट्टीला आग लागली. झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि तेथुन ती हळूहळू परिसरात पसरली. आगीसार धुराचे लोट परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर संबंधित कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याबाबत अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी घरेलू गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन व नागरिकांकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.