मंत्रालयाला भीषण आग!! महत्वाची कागदपत्रे जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग लागली आहे. वल्लभ भवनच्या गेट क्रमांक 5 आणि 6 समोरील जुन्या इमारतीत ही आग लागली. तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरत आहे. या आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग वीजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.

हि आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. पाच आणि सहा क्रमांकाच्या गेटसमोर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इमारतीत धूर निघताना दिसला. त्यानंतर मंत्रालयाचे सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या एकूण ८ गाड्या रवाना झाल्या असून आग वीजवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहे.

दरम्यान, मागील वर्षी 12 जून 2023 रोजी वल्लभ भवनासमोरील सातपुडा भवनात भीषण आग लागली होती. यामध्ये आदिवासी कल्याण विभागाचे प्रादेशिक कार्यालय पूर्णपणे जळून खाक झाले. याशिवाय इतर विभागांनाही आगीची झळ सोसावी लागली होती. त्यावेळी सुद्धा आग नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 20 अग्निशमन दलाच्या गाड्या पोचल्या होत्या. अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आणण्यात त्यावेळी यश मिळाले होते.