औरंगाबाद | घाटी रुग्णालयातील प्रसूती कक्षाच्या परिसरातील जुन्या ‘एनआयसीयू’च्या प्रवेशद्वाराजवळच इलेक्ट्रिक बोर्डमध्ये झालेल्या स्पार्किंगमुळे सुरुवातीला धूर निघाला होता त्यानंतर त्याचे रूपांतर आगीत झाले. सुदैवाने यामध्ये कोहितीही दुर्घटना घडली नाही. ही घटना मंगळवारी घडली.
हाती आलेल्या माहिती नुसार, घाटी रुग्णालयातील प्रसूती कक्षाच्या परिसरातील जुन्या ‘एनआयसीयू’ च्या प्रवेशद्वाराजवळच स्पार्किंगमुळे इलेक्ट्रिक बोर्डमधून धूर निघत होता. यावेळी ‘एनआयसीयू’मध्ये १८ शिशू होते. दूर निघाल्याची बाब लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली.आणि सर्व शिशू सुखरुप राहिले.
या ‘एनआयसीयू’ च्या प्रवेशद्वाराला लागूनच इलेक्ट्रिक बोर्ड आहे. सायंकाळी 5:15 वाजेच्या सुमारास या बोर्डमध्ये अचानक स्पार्किंग झाले. त्यामुळे त्या बोर्डमधून धूर निघत असल्याचे ‘एमएसएफ’ च्या महिला सुरक्षारक्षक जया भगत आणि मीना जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार तात्काळ सुरक्षा पर्यवेक्षक अरविंद घुले यांना सांगितला. तेव्हा अरविंद घुले यांच्यासह सुरक्षारक्षक रामेश्वर नागरे, गौरव साळुंखे यांनी लेबर रुमकडे धाव घेतली. ज्या ठिकाणाहून धूर निघ होता, त्या ठिकाणी अग्नीरोधक सिलेंडरचा मारा करण्यात आला.त्यामुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही. या घटनेनंतर इलेक्ट्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक बोर्ड दुरुस्त केला. त्याचबरोबर जवानांच्या तत्परते विषयी कर्मचाऱ्यांनी कौतुक करण्यात आले.
‘एनआयसीयू’ मध्ये कोणतीही घटना झालेली नाही. प्रसूती कक्षातून (लेबर) आलेल्या वायरिंगच्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये स्पार्किंग झाले होते. ‘एनआयसीयू’त दाखल सर्व १८ शिशू सुखरुप आहेत. कोणतीही मोठी घटना नव्हती. सर्व उपकरणे काम करत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. दोन वर्षांपूर्वीच वायरिंग झालेली आहे, असे नवजात शिशू विभागाचे डॉ. अमोल जोशी यांनी सांगितले.