Wednesday, March 29, 2023

जवानाचा एके-47 मधून सहकाऱ्यांवरच गोळीबार; निवडणूक ड्युटीवरील दोघांचा मृत्यू

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यात जवानांमध्ये आपापसात गोळीबार झाल्याची घटना घडली. यावेळी झालेल्या चकमकीत भारतीय राखीव बटालियनचे (आरपीएफ) दोन जवान शहीद झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोरबंदर जिल्ह्यात जवानांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून ज्या सैनिकांमध्ये ही चकमक झाली आणि त्यानंतर गोळीबार झाला, ते सैनिक निवडणूक ड्युटीसाठी आले होते, अशी माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.

- Advertisement -

एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर एके-47 मधून गोळीबार केला आहे. मात्र, गोळीबार झाला तेव्हा कोणताही जवान ऑन ड्युटी नव्हता. पोलीस सध्या या प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी मृत जवानांचे सहकारी आणि जवानांच्या दुसऱ्या गटाच्या सहकाऱ्यांचीही चौकशी करत आहेत. या घटनेतील जवान भारतीय राखीव बटालियनचे (मणिपूर) असून ते सध्या गुजरातमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तैनात आहेत.