Saturday, June 3, 2023

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; चारजण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारातून इम्रान खान सुरक्षित बचावले असले तरी त्यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. तर गोळीबारात चारजण जखमी झाले आहेत.

पाकिस्तान येथील वजिराबाद येथे आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हेही या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी रॅलीत अचानकपणे गोळीबार झाला. या गोळीबारात इम्रान खान जखमी झाले आहेत. तर गोळीबारात चारजण गंभीर जखमी झाले असून तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत.

इम्रान खान यांच्या रॅलीत अचानक काही हल्लेखोर घुसले आणि त्यांनी जवळपास सहा ते सात राऊंड फायर केले. यामध्ये इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबारानंतर एकच गदारोळ सुरु झाला होता. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना अटक केली आहे.