Firing Outside Salman House : सलमान खान, हा तर ट्रेलर आहे; गोळीबार प्रकरणी ‘या’ गँगस्टरच्या भावाने घेतली जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर आज सकाळी गोळीबार (Firing Outside Salman House) झाल्याने मोठी खळबळ उडाली. हा गोळीबार कोणी केला असेल असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांना पडला आहे. या गोळीबारानंतर पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी जाऊन अधिक तपास सुरु करत आहेत. त्याच दरम्यान आता अखेर एका गँगस्टरने सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. हा गँगस्टर दुसरा तिसरा कोणी नसून लॉरेंस बिश्नोई चा भाऊ अनमोल बिष्णोई हा आहे.

अनमोल बिष्णोईने (Anmol Bishnoi) सोशल मीडिया पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदरी घेतली आहे तसेच सलमानला अजून धमकावलं आहे. अनमोल आपल्या पोस्ट मध्ये म्हणतो, “ओम जय श्री राम, जय गुरुजी जंभेश्वर, जय गुरु दयानंद सरस्वती, जय भारत. आम्हाला शांतता हवी आहे. दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून घेतला जात असेल, तर युद्ध योग्य आहे. सलमान खान, आम्ही हे फक्त ट्रेलर दाखवण्यासाठी केले आहे, जेणेकरुन तुला आमची ताकद कळेल. हेच नाही तर आम्ही तुला ही शेवटची वार्निंग देतो यानंतर या गोळ्या फक्त घरावर चालणार नाहीत असेही या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. तू दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना देव मानले असेल पण आम्ही त्यांच्या नावाची २ कुत्रे पाळली आहेत. बाकी आम्हाला जास्त काय बोलायची आवश्यकता नाही असं म्हणत अनमोल बिष्णोईने सलमानला पुनः एकदा धमकीवजा इशारा दिला आहे.

दरम्यान, सलमान खानच्या घराबाहेर या गोळीबारामागे (Firing Outside Salman House) बिष्णोई गॅंग (Bishnoi Gang) असण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात आहे, कारण यापूर्वी सुद्धा सलमानला बिष्णोई गॅंगकडून सातत्याने धमक्या देण्यात येत होत्या. 2022 मध्ये सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना एक चिठ्ठी द्वारे धमकी देण्यात आली होती. यामध्ये ‘मुसेवाला जैसा कर देंगे’, असं लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. त्यानंतर त्याला बिष्णोई गॅंग कडून धमक्यांचे सत्र सुरूच होते. त्यातच आता थेट सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बिष्णोई गॅंग सलमानच्या मागे हात धुवून का लागली आहे? Firing Outside Salman House

1998 साली सलमानच्या हम साथ साथ है चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमध्ये झालं होते. त्याकाळात सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याची घटना समोर आली. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जात आणि त्याची पूजाही केली जाते. त्यामुळे काळवीट प्रकरणात सलमान खानचे नाव आल्याने संपूर्ण बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे.याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं. आताही सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आल्यावर मुख्य संशय हा बिश्नोई गँगवरच होता.