First AI Hospital | देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. अशातच आता चीन राजधानी बीजिंगमध्ये जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे हॉस्पिटल सुरू झालेले आहे. सिंघुआ विद्यापीठाच्या संशोधकांनी हे हॉस्पिटल तयार केलेले आहे. या रुग्णालयात एकूण 14 एआय डॉक्टर आणि चार नर्स आहेत. हे डॉक्टर दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहेत. या डॉक्टरांची रचना रोगांचे निदान करण्यासाठी उपाय योजना तयार करण्यासाठी आणि परिचारिकांना दैनंदिन आधार देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. ही प्रणाली प्रथम वैद्यकीय विद्यापीठांना मदत करण्यासाठी वापरली जाते.
या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल | First AI Hospital
संशोधकांचे म्हणणे आहे की हे एआय डॉक्टर जगातील कोणत्याही प्रकारच्या साथीच्या रोगाचा प्रसार आणि त्यांचे उपचार इत्यादींबाबत माहिती देऊ शकतील. ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार, एजंट हॉस्पिटलने अमेरिकन वैद्यकीय परवाना परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरे ९३.६ टक्के अचूकतेने दिली आहेत. एजंट हॉस्पिटलचे लिऊ यांग सांगतात की वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही या भविष्यकालीन आभासी हॉस्पिटलमधून खूप काही शिकायला मिळेल. तसेच लोकांना कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळू शकतील. त्यांच्या मदतीने अधिकाधिक लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येतील. येत्या काही दिवसांत हे रुग्णालय सुरू होणार आहे.
एआय रोबोट्स कारमध्ये इंधन भरतात
आजपर्यंत कधीच रोबोट कारमध्ये इंधन भरताना पाहिलं नाही, तुम्ही हॉलिवूड चित्रपटांमध्येही कार चालकाला इंधन भरताना पाहिलं असेल. असे अनेक देश आहेत जिथे इंधन भरण्यासाठी लोकांना कामावर ठेवले जाते. पण तुम्ही कल्पनाही करू शकता का की असे काही देश आहेत जिथे कारमध्ये इंधन भरण्यासाठी माणसांचा नव्हे तर रोबोटचा वापर केला जातो?
अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथील नॅशनल ऑइल कंपनीने वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स उर्फ एआयच्या मदतीने एआय रोबोट तयार केला आहे. हा एआय रोबोट इंधन स्टेशनवर अगदी सहजतेने वाहनांमध्ये इंधन भरण्यास सक्षम आहे.