भारत पुन्हा इतिहास रचणार! गगनयान मोहीमेची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारताला अभिमान वाटावा अशी इस्रोने पुन्हा एकदा कामगिरी करून दाखवली आहे. आज गगनयान मोहिमेचे पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. टेस्ट व्हेईकल या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे प्रक्षेपण आज सकाळी ठीक 10 वाजता करण्यात आली. ही एक अत्यंत महत्त्वाची चाचणी होती. जिला यश मिळाले आहे. त्यामुळे आता इस्रो अवकाश मोहिमेसाठी सज्ज झाला आहे.

भारत चंद्रयान मोहिमेच्या यशानंतर गगनयान मोहिमेच्या तयारीला लागला आहे. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून इस्रो तीन क्रू सदस्यांना तीन दिवसांसाठी अंतराळात पाठवणार आहे. या मोहिमेसाठीच आज अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री ‘टीव्ही-डी१’मधील ‘क्रू मोड्यूल’द्वारे घेण्यात आली. जी यशस्वीरित्या पूर्ण देखील झाली. या चाचणीच्या यशामुळे इस्रो उर्वरित चाचण्या करण्यासाठी आणि पुढील कामगिरी फत्ते करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतासाठी गगनयान मोहिम अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. येत्या 2025 मध्ये गगनयान मोहीम प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे.

https://x.com/ANI/status/1715588296284545091?s=20

दरम्यान, गगन्यान मोहिमेच्या माध्यमातून क्रू मॉड्यूलच्या बाहेर अंतराळात प्रक्षेपित करणे, त्याला पृथ्वीवर परत आणणे या गोष्टी करण्यात येणार आहे. यासाठी आज यानाची पहिली चाचणी श्रीरहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून घेण्यात आली. हे यान 34.9 मीटर उंच आहे आणि त्याचे वजन ४४ टन आहे. सुरुवातीला आज सकाळी ठीक 8 वाजता यानाचे उड्डाण होणार होते. मात्र खराब हवामानामुळे यानाने ठीक 10 वाजता यशस्वी उड्डाण केले.