First Fodder camp In Maharashtra | महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी ‘या’ जिल्ह्यात सुरु; पहिल्याच दिवशी 700 जनावरे दाखल

First Fodder camp In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | First Fodder camp In Maharashtra यावर्षी उन्हाचा पारा खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे 40° च्या जवळपास पोहोचलेले आहे. उन्हामुळे अनेक ठिकाणी दुष्काळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. माणसांसोबत आता पाळीव प्राण्यांच्या पाण्याचा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे. उष्णतेमुळे धरणांमधील पाणीसाठा देखील कमी होत असल्याने शेतीला पाणीपुरवठा कमी होत आहे.

या सगळ्याचा परिणाम आता जनावरांच्या चाऱ्यावर देखील होत आहे. आणि जनावरांच्या चाऱ्याचा एक गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे. अशातच आता राज्यातील पहिली चारा छावणी (First Fodder camp In Maharashtra) मराठवाड्यात सुरू करण्यात आलेली आहे. ती छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे सुरू करण्यात आलेली आहे.

मागील वर्षी राज्यामध्ये कमी पाऊस झाला आणि या पावसाचा फटका सर्वात जास्त छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला बसला होता. येथील पैठणच्या जायकवाडी धरण्यात फक्त 14.29% पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे आता लोकांना पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे. पाणीटंचाईमुळे जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे.

यासाठीच आता आमदार प्रशांत बंब यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर चारा छावनी सुरू केलेली आहे. ही छावणी खोजेवाडी येथे सुरू केलेली आहे. आणि इथे पहिल्याच दिवशी 700 जनावरे दाखल देखील झालेली आहे. या चारा छावणी मुळे पशुपालकांना दिलासा मिळालेला आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 138 मोठ्या धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा हा 31 पॉईंट 73 टक्के शिल्लक राहिलेला आहे, तर इतर 2994 धरणांमध्ये 32.63% पाणी शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात सध्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

मराठवाड्याला सर्वाधिक टँकर लागत आहे. मराठवाड्यात सध्या 1183 टँकर फिरत आहेत. अशी माहिती समोर आलेली आहे मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा वगळता इतर सात जिल्ह्यांमध्ये टॅंकरने पाणी सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी नगरमध्ये फिरवले जात आहे. या ठिकाणी दररोज 527 टँकर लागत आहे. या जिल्ह्यात पाणीटंचाईची सगळ्यात भीषण परिस्थिती समोर आलेली आहे.