Satara News : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जरांगे-पाटलांची पहिली सभा; माणदेशात धडाडणार मराठ्यांची तोफ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |मराठा आरक्षणातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची पहिली सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आलेल्या सातारा जिल्ह्यात मानदेशात होत आहे. माण तालुक्यातील दहिवडीत शुक्रवारी (दि. २०) रात्री ८ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला सातारा, सांगली, सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात

मनोज जरांगे-पाटलांची जाहीर सभा नुकतीच जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे झाली. लाखोंच्या संख्येने मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये एकवटला. मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांनी सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आता त्यांनी महाराष्ट्रातील दौर्‍याला सुरुवात केली आहे.

माणदेशात पहिली सभा

आंतरवाली सराटी नंतर मनोज जरांगे-पाटलांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा सातारा जिल्ह्यातील माणदेशात होत आहे. माण तालुक्यातील दहिवडीत शुक्रवारी जाहीर सभा होणार आहे. त्याची तयारी देखील सुरू झाली आहे. या सभेला देखील लाखो लोक उपस्थित राहतील.

शंभू महादेवाच्या दर्शनानंतर घेणार सभा

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन ते दहिवडीतील सभेला येणार आहेत. या सभेनंतर ते गावी जाऊन २४ ऑक्टोबरपासूनच्या संभाव्य उपोषणाची तयारी करणार आहेत. त्यामुळे माणदेशातील यांच्या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.