राम मंदिराला बसवण्यात आले पहिले ‘सुवर्णद्वार’; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. सध्या या मंदिरासाठी कर्मचारी आणि कारागीर दिवस रात्र काम करत आहेत. आता राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस राहिल्यामुळे मंदिराला सुवर्ण जडीत दरवाजा बसवण्यात आला आहे. नवीन उभारण्यात आलेल्या राम मंदिरात नुकताच एक सुवर्णजडीत दरवाजा बसवण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या अनुराधा टिंबर इंटरनॅशनल कारागिरांनी राम मंदिरासाठी सोन्याचे दरवाजे तयार केले आहेत. हे दरवाजे नागरशैली तयार करण्यात आले आहेत. तसेच या दरवाजांसाठी बक्कळ अशी रक्कम देखील मोजावी लागली आहे. एका कामगाराने सांगितले आहे की, सोमवारी राम मंदिरासाठी 14 सोन्याचे दरवाजे अयोध्येत आले. त्यातील एक राम मंदिरात बसवण्यात आला आहे या सर्व पार्श्वभूमीवर मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तर चोख सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आली आहे.

येत्या 15 जानेवारीपासून राम मंदिरात इतर तेरा सुवर्णजडीत दरवाजे बसवले जाणार आहेत. त्यामुळे दरवाजे बसवण्याचे काम लोकांवर पण सोहळ्याच्या अगोदर पूर्ण झालेले असेल. विशेष बाब म्हणजे, राम मंदिरामध्ये बसवण्यात आलेले सोन्याचे दरवाजे पुढील शंभर वर्ष खराब होणार नाही. या दरवाजांना बनवण्यासाठी विशेष सागवानाच्या लाकडांचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर 14 दरवाजांमधील एका दरवाजाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत हा सोन्याचा दरवाजा लखलख चकाकताना दिसत आहे. यातूनच राम मंदिराला उभारण्यासाठी आणि त्याची शोभा वाढवण्यासाठी विशेष मेहनत आणि खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.