व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आग्र्याच्या किल्ल्यात आज गुंजणार छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे यांना ज्या किल्ल्यात औरंगजेबाने कैद केले होते त्या ठिकाणी आज प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातून 10 हजार शिवभक्त गेले आहेत. शिवजयंती निमित्ताने आग्रा किल्ल्यावर पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा गुंजणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील सहभागी होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती आज 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. यामुळे आग्रा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने मागितली होती. त्यास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून परवानगी मिळाली.

हे कार्यक्रम होणार

शिवजयंतीचा पहिला टप्पा शुक्रवारी रंगीत तालीम करुन झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून हजारो जण येणार आहेत. तसेच आग्रा कोर्टासमोरील रामलीला मैदानावर मोठा एलईडी स्क्रीन लावून हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान व आर. आर. पाटील फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.