Fish Aquarium Mumbai : भायखळा येथील राणीच्या बागेत म्हणजेच वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात परदेशातल्या मत्स्यालयांप्रमाणे काचेच्या बोगद्यांमधून प्रवेश करत रंगीबेरंगी मासे आणि समुद्री दुनियेचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी विविध करा सहित जवळपास 60 कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्या राणीच्या बागेतले पेंग्विन्स हे तिथलं मुख्य आकर्षण आहे त्यानंतर आता हे मत्स्यालय (Fish Aquarium Mumbai) हे देखील इथलं मुख्य आकर्षण होईल यात शंका नाही.
60 कोटी रुपये खर्च
आंतरराष्ट्रीय दर्जाचा मत्स्यालय व्हावं असा विचार मागच्या दोन वर्षांपासून होत होता. मात्र हा विषय मागे पडला होता आता मत्स्यालय राणीच्या बागेतच (Fish Aquarium Mumbai) उभारण्याचा पुनर्विचार केला जात असून त्यासाठी निविदा देखील मागवल्या जात आहेत. या प्रकार या प्रकल्पासाठी 50 कोटी तर विविध करांसह हा खर्च साठ कोटींपर्यंत जाईल अशी माहिती राणीच्या बागेचे संचालक डॉक्टर संजय त्रीपाठी यांनी दिली आहे
नव्या खास तंत्रज्ञानाचा वापर
राणीच्या बागेत उभारला जाणारा काचेचा बोगदा हा 14 मीटर तर दुसरा 36 मीटर लांब असणार आहे. याशिवाय मत्सालयात विविध आकारांचे माशांचे टॅंक असणार आहेत अधिक नैसर्गिक अनुभव (Fish Aquarium Mumbai) येण्यासाठी त्यामध्ये दगडांची आणि प्रवाळांची आणि सागरी जीवनासारख्या घटकांची रचना तयार करण्यात येणार आहे. पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी दहा लाख लिटर क्षमतेची एक विशेष जल जीव रक्षक यंत्रणा देखील यामध्ये बसवली जाणार आहे अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
देश विदेशातील मासे आणि जलचर (Fish Aquarium Mumbai)
केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातील विविध प्रकारच्या जातींचे आकर्षक (Fish Aquarium Mumbai) मासे आणि जलचर यांचा समावेश देखील या मत्सालयात असणार आहे. यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे देखील माहिती आहे. हा नवीन मसाल्याचा कक्ष हा पेग्विनच्या कक्षाचा शेजारीच उपलब्ध करण्यात येणार असून 60 चौरस मीटर ने पेग्विन पक्षाचा विस्तार करण्यात येणार आहे.