Fishermen’s Boat Sank In Raigad : मोठी बातमी!! रायगडात मच्छीमारांची बोट बुडाली; बचावकार्य सुरु

Fishermen's Boat Sank In Raigad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Fishermen’s boat sank in Raigad । रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उरण करंजा रायगड समुद्रामध्ये मच्छीमारांची बोट बुडाल्याची घटना घडली आहे. करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ, आणि नौदालाच्या गस्त नौकाद्वारे बचावकार्य करण्यात आलं आहे. अडकलेल्या मच्छीमाराना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवण्यात यश आलं असल्याचं बोललं जातेय.

मासेमारी बंदी असतानाही बोट समुद्रात – Fishermen’s boat sank in Raigad

प्राथमिक माहितीनुसार, रायगडमधील उरण या भागात ही बोट दुर्घटना झाली आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचे बोलले जात आहे. या बोट दुर्घटनेचे काही व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत. बोटीमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याने हि बोट बुडाली असल्याचे बोललं जात आहे. सदर बोट कोणाची आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. समुद्रात बुडालेल्या या बोटीत (Fishermen’s boat sank in Raigad) एकूण सात खलाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या खलाशांना वाचवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केला गेला. महत्वाची बाब म्हणजे मुसळधार पावसामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात गेलीच आली, असा सवाल आता उपस्थित केली जात आहे.

समुद्राला आलेलं उधाण पाहता मच्छिमारांनी काळजी घेणं गरजेचं आहे, सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. बचावकार्य तातडीनं होणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे सदर घटनेसंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य परवाना विभाग,कस्टम, पोलीस यांनी सदर घटनेसंदर्भात जातीने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे.