चाकूचा धाक दाखवून पावणेपाच लाखांना लुटले

money
money
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | वैजापूर तालुक्यातील देवगाव शनि येथील परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 4 लाख 65 हजारांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवगाव शनि गावालगत यांची वस्ती आहे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी भगवान ज्ञानदेव गोरे यांच्या घरावर दरोडा टाकला. भगवान गोरे यांचे आई-वडील झोपेत होते तेव्हा चार चोरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आणि गोरे यांची सून व मुलगा यांना चाकूचा धाक दाखवून आत बंदिस्त केले.

दरम्यान, गोरे यांना जाग आली असता त्यांना व त्यांच्या पत्नीच्या गळ्याला चाकु लावुन सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम साधारण पावणे पाच लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरांनी पळ काढला. या घटनेची माहिती विरगाव पोलिस ठाण्यात मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नरोडे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. औरंगाबादवरून श्वान पथकाला पाचारण देखील करण्यात आले होते. काही अंतरावर बॅटरी, डब्बा त्यात सोन्याची मुरणी व पाच रुपयाचे नाणे, पुढे रस्त्यावर दागिन्यांची मोकळी छोटी पर्स असे साहित्य सापडले मात्र पावत्यासह सोने गायब होते. या घटनेबाबत भगवान गोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक नारोडे करत आहेत.