Flipcart Minutes | फ्लिपकार्ट ही भारतातील एक प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी आहे. ऑनलाइन सेवा पुरवण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन गोष्टी लॉन्च करत असते. अशातच आता फ्लिपकार्ट भारतात आपले ई कॉमर्स व्हर्टीकल लॉन्च करू शकते. याचे नाव व्हर्टिकल मिनिसट्स ठेवले जाऊ शकते. त्यांनी चालू केलेले हे कॉमर्स व्हर्टीकल जुलै महिन्यात लॉन्च करून जाऊ शकते. फ्लिपकार्ट हे झटपट कॉमर्समध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. परंतु या आधी देखील फ्लिपकार्टने असे प्रयत्न केलेले आहेत. झटपट कॉमर्स मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा फ्लिपकार्टचा हा तिसरा प्रयत्न आहे.
कंपनीने गेल्या काही वर्षात असे दोन प्रयत्न केले होते. त्यात फारसे त्यांना यश मिळाले नव्हते. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार फ्लिपकार्टच्या(Flipcart Minutes) माध्यमातून आता कंपनीने 15 मिनिटात त्यांच्या वस्तू डिलिव्हर करण्याचे टार्गेट समोर ठेवलेले आहेत. कंपनी त्यांची ही नवीन सेवा 15 जुलैपासून सुरू करू शकते. आणि फ्लिपकार्ट या सुविधेचा ग्राहकांना चांगलाच लाभ होणार आहे.
फ्लिपकार्ट मिनिट्सच्या माध्यमातून कंपनी किराणा माल तसेच इतर आवश्यक गोष्टींसह ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा देखील यामध्ये समावेश करणार आहे. याआधी कंपनीने फ्लिपकार्ट क्विक या नावाने ही आपली सेवा सुरू केली होती. ज्यामध्ये त्यांनी 90 मिनिटांनी पोहोचवण्याचे टार्गेट समोर ठेवलेले होते. परंतु त्यांची ही सेवा यशस्वी होऊ शकली नाही. परंतु कंपनीने अजूनही फ्लिपकार्ड मिनिट्स बाबत कोणती अधिकृत घोषणा केली नाही. परंतु याबाबत अनेक अंदाज देखील बांधले जात आहेत.
कोविडच्या महामारीनंतर ई-कॉमर्स मार्केटमध्ये बरीच वाढ झालेली आहे. ब्लिंकिट या प्लॅटफॉर्मचा देखील मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. त्यामुळे आता फ्लिपकार्ट सोबत रिलायन्स देखील या बाजारात प्रवेश करण्याची शक्यता आहे. रिलायन्स देखील लवकरच आपली क्विक सेवा लाँच करेल, असे काही अहवालात सांगण्यात आलेले होते.