Flipkart वर आजपासून Big Bachat Dhamaal Sale; या वस्तूंवर 80% सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वर आजपासून बिग बचत धमाल सेल सुरू होत आहे. हा सेल एक सप्टेंबर ते 3 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या सेलच्या माध्यमातून फ्लिपकार्ट यूजर्स एक लाख पेक्षा जास्त प्रॉडक्टवर बेस्ट डीलचा फायदा घेऊ शकतात. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट मध्ये सुरू असलेल्या या सेलमध्ये काही कॅटेगिरी मध्ये बऱ्याच प्रॉडक्टवर 80 टक्के सूट देखील देण्यात येत आहे.

ॲक्सेसरीज, फर्निचर, टीव्ही अँड अप्लायन्सेस वर डिस्काउंट

फ्लिपकार्टच्या आजपासून सुरू झालेल्या या Big Bachat Dhamal Sale मध्ये फॅशन ब्युटी मेकअप होम किचन टूल्स डेकोर अँड फर्निशिंग मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स अँड ॲक्सेसरीज याशिवाय फर्निचर टीव्ही अँड अप्लायन्सेस या सर्व गोष्टींवर डिस्काउंट देण्यात येत आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना 1000 पेक्षा जास्त ब्रँड हजारो प्रोडक्ट्स वर फ्री डिलिव्हरी डिस्काउंट आणि इझी रिटर्न यासारख्या सुविधा मिळू शकतात. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट वर बँक ऑफर्स देखील देण्यात आले आहेत.

499, 699, 799, 999 रुपयांचे फिल्टर ऑप्शन उपलब्ध

फ्लिपकार्टच्या Big Bachat Dhamaal Sale मध्ये ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार शॉपिंग करण्याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी तयार करण्यात आलेला मायक्रोसाईट मध्ये वेगवेगळ्या किमतीनुसार प्रॉडक्ट फिल्टर करण्याचा ऑप्शन देण्यात आला आहे. या फिल्टर ऑप्शन मध्ये 499, 699, 799, 999 रुपयांचे फिल्टर ऑप्शन देण्यात आले आहे. तुम्ही 499 रुपयांपेक्षा कमी किमतीत घराच्या सजावटीसाठीचे सामान इथपासून ॲक्सेसरीज कपडे असे बरेच प्रॉडक्ट खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर 499 मध्ये तुम्हाला बॅकपॅक आणि शूज देखील उपलब्ध होतील.

होम अप्लायन्सेस वर 70 टक्के सूट

फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेलमध्ये होम अप्लायन्सेस वर 70 टक्के, वॉशिंग मशीन वर 60 टक्के, पर्सनल केअर प्रॉडक्ट वर 60 टक्के, क्लोथ वर 60 ते 70 टक्के, ग्रोसरीजवर 70% सूट देण्यात येत आहे. यासोबतच स्पोर्ट आणि फिटनेस प्रॉडक्ट्स वर 80 टक्के सूट देण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स म्हणजेच स्मार्ट टीव्ही मॉनिटर आणि स्मार्टफोनवर 75 टक्के डिस्काउंट देण्यात येत असून फ्लिपकार्टच्या ॲक्सिस बँक कार्ड युजर्स ला कॅशबॅक ऑफर देखील देण्यात येत आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा खास चान्स

होम अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर ग्राहकांना प्रचंड फायदा होऊ शकतो. फ्लिपकार्टच्या या बिग बचत धमाल सेलमध्ये ग्राहकांना कमी किमतीत होम अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची खास संधी देण्यात आली आहे. युजर्स 4K स्मार्ट टीव्ही, एयर कंडीशनर, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, यासारखे मोठे प्रॉडक्ट एम आय वर देखील खरेदी करू शकतात. यासोबतच फॅन, गिझर, वैक्युम क्लिनर, प्युरिफायर्स, मायक्रोवेव्ह ओवन, किचन अप्लायन्सेस या सर्व गोष्टींवर देखील ऑफर्स देण्यात येत आहे. ग्राहक किचन अप्लायन्सेस फक्त 299 च्या सुरुवाती किमतीवर खरेदी करू शकतात.