हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Flipkart Republic Day Offers 2025 – तुम्ही जर 2025 मध्ये iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते . कारण iPhone 14 आता कमी किमतीत उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्ट iPhone 14 सीरिजच्या विविध मॉडेल्सवर मोठी सूट ( Flipkart Republic Day Offers 2025) देत आहे. Apple ने iPhone 14 सीरिज 2022 मध्ये लाँच केली होती, आता या काळात या फोनची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे 2025 मध्ये iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यासाठी हि एक उत्तम संधी आहे. तर चला फ्लिपकार्ट iPhone 14 सिरीजच्या मॉडेल्सवर किती सवलत देत आहे , याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
iPhone 14 ची दमदार डिझाइन ( Flipkart Republic Day Offers 2025) –
iPhones त्याच्या दमदार डिझाइन आणि मजबूत सुरक्षेसाठी ओळखले जातात. हा फोन दोन वर्षे जुना असला तरी iPhone 14 अजूनही अनेक Android फोनपेक्षा चांगले कार्यप्रदर्शन करतो. Apple A15 Bionic चिपसेटसह, iPhone 14 तुम्हाला सुलभ अनुभव देतो, ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करू शकता किंवा अनेक अॅप्स वापरू शकता.
iPhone 14 वर ऑफर –
Republic Day च्या दिवशी फ्लिपकार्ट iPhone 14 ( Flipkart Republic Day Offers 2025) वर चांगली ऑफर देत आहे. आता तुम्ही या स्मार्टफोनला सर्वात कमी किंमतीत खरेदी करू शकता. iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 59,900 रुपये होती, पण आता 14% सवलतीनंतर त्याची किंमत 50,999 रुपये झाली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी भन्नाट संधी उपलब्ध झाली आहे.
iPhone 14 बँक ऑफर ( Flipkart Republic Day Offers 2025) –
14% सवलतीशिवाय, फ्लिपकार्ट आणखी काही ऑफर देत आहे. HDFC बँकेच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांची सवलत मिळेल. तुम्ही हा स्मार्टफोन EMI मध्ये देखील खरेदी करू शकता, ज्याचा सुरुवातीचा हप्ता (installment) फक्त 1,793 रुपये आहे. तसेच फ्लिपकार्ट एक चांगला एक्सचेंज ऑफर देखील देत आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक पैसे वाचवू शकता.
iPhone 14 ची वैशिष्ट्ये –
(Flipkart Republic Day Offers 2025) तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असल्यास, तुम्ही तो एक्सचेंज करून 30,200 रुपये पर्यंत मिळवू शकता. जर तुम्हाला हि रक्कम न मिळाल्यास, तरीही तुम्ही iPhone 14 खूप कमी किमतीत मिळवू शकता. पण लक्षात ठेवा की तुमच्या जुन्या फोनच्या किमतीवर त्याची स्थिती अवलंबून असेल. iPhone 14 ऍल्युमिनियम फ्रेम आणि ग्लास बॅक पॅनलसह तयार करण्यात आले आहे. याला IP68 रेटिंग आहे, म्हणजेच तो धूळ आणि पाणीपासून सुरक्षित आहे. या फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले आहे, ज्याची अधिकतम ब्राइटनेस 1200 निट्स आहे आणि तो HDR10+ सपोर्ट करतो. या डिस्प्लेला सिरेमिक शील्ड ग्लासने संरक्षित केले आहे. तसेच यामध्ये Apple A15 Bionic प्रोसेसर आहे, जो अत्यंत वेगवान आहे. यामध्ये दोन 12 मेगापिक्सल कॅमेरे आहेत, ज्यामुळे तुम्ही उत्तम फोटो घेऊ शकता. यामध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज दिलं गेलं आहे.
हे पण वाचा : : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ॲमेझॉनसह फ्लिपकार्टवर मोठया सेलची घोषणा