Flipkart च्या Year End Sale मध्ये ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळत आहेत जबरदस्त ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता आपण लवकरच नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. मात्र, हे वर्ष संपण्याआधी ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Flipkart ने ग्राहकांसाठी Year End Sale सुरु केला आहे. 31 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये TWS इअरबड्स, स्मार्टफोन, स्मार्टवॉच सारख्या उत्पादनांवर मोठी सवलत मिळते आहे. जर आपण नवीन फोन खरेदी करणार असाल हा फ्लिपकार्टचा हा फोन आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल.चला तर मग या सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोनवर किती सवलत दिली जात आहे ते जाणून घेउयात…

Poco M4 Pro 5G Price in India, Full Specifications & Features - 27th  December 2022 | DigitPOCO M4 Pro 5G

Flipkart च्या या सेलमध्ये POCO M4 Pro 5G चा 6GB RAM + 128GB ROM व्हेरिएंट 13,999 रुपयांच्या किंमतीवर लिस्ट करण्यात आला आहे. याची मूळ किंमत 19,999 रुपये आहे. तसेच या सेलमध्ये फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 5,000 रुपये आणि त्याहून जास्त किंमतीच्या ऑर्डरवर 3,000 रुपयांपर्यंतचा 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकते. याशिवाय या फोनवर 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच यामध्ये Mediatek Dimensity 810 प्रोसेसर आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे.

Vivo T1 44W has been launched in India! - xiaomiui

Vivo T1 44W

Flipkart च्या या सेलमध्ये Vivo T1 44W चा 4GB RAM + 128GB ROM व्हेरिएंट 14,499 रुपयांच्या किंमतीवर लिस्ट करण्यात आला आहे. याची मूळ किंमत 19,999 रुपये आहे. तसेच फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 5,000 आणि त्याहून जास्त किंमतीच्या ऑर्डरवर 3,000 रुपयांपर्यंतचा 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकते. याशिवाय या फोनवर 13,600 पर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. 6.44-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर प्रायमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Realme 9 price in Pakistan & features

Realme 9

Flipkart च्या या सेलमध्ये Realme 9 चा 6 GB RAM + 128 GB ROM व्हेरिएंट 20,999 रुपयांऐवजी 13,999 रुपयांच्या किंमतीवर लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना यावर अतिरिक्त पाच टक्के कॅशबॅक देखील मिळेल. याशिवाय या फोनसाठी 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच यामध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपही आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/offers-store

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आज 323 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण, आजचे दर तपासा
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 20 वर्षांत दिला 1920% रिटर्न