समृद्धी महामार्गावरील शहापूर जवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | समृद्धी महामार्गावर असलेल्या शहापूर-किन्हवली मार्गावरील उड्डाण पूल हा आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाश्यांचे होणारे हाल थांबणार आहेत. या मार्गाचे काम मागील पाच महिन्यापासून सुरु आहे. शेलवली-शेरे गाव हद्दीत या उड्डाण पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी उंच टेकडी, पाषाणाचे थर असल्यामुळे दगडफोड करण्यासाठी कठीण जात होते. त्यासाठी या कामासाठी शक्तिमान यंत्रणा वापरावी लागत होती. त्यामुळे यां मार्गावरील वाहतूक ही दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली होती. त्यामध्ये शहापूर-किन्हवली, डोळखांब रस्त्याचा समावेश होता. मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांना होणारा त्रास दूर होणार आहे.

शेलवली-शेरे गाव हद्दीत उड्डाण पुलाचे काम होते सुरु

प्रवासासाठी शहापूर-किन्हवली मार्गावरील उड्डाण पूलाचे काम पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाचा घोटी-कसारा-इगतपुरी, सरळांबे, फळेगाव ते भिवंडी- वडपे- आमणे हा 49  किलोमीटरचा रस्ता शहापूर तालुक्यातून जात आहे. त्यामुळे या रस्ते मार्गात शहापूर- किन्हवली मार्गावर शेलवली – शेरे गाव हद्दीत उड्डाण पुलाचे काम सुरू होते. या रस्त्या दरम्यान असलेले रस्त्याचे टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे तेही वाहतुकीसाठी खुले करण्याची योजना आहे.

पुलाखालून धावणार नाशिक-घोटीकडून येणारी वाहने

शहापूर येथील पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे यां पुलाच्या खालून समृद्धी महामार्गावर नाशिक-घोटीकडून येणारी वाहने पुलाखालून भिवंडीकडे जाणार आहेत. येत्या दोन – तीन महिन्यात समृद्धीचा शहापूर तालुक्यातील टप्पा खुला करण्याचे शासनाचे नियोजन आहे. खुला करण्यात आलेल्या या टप्प्यामुळे अनेक लोक येथून ये जा करत आहेत.