अर्थमंत्री LIVE: प्रवासी मजुरांसाठी सरकारने उघडले रोजगार हमी योजनेचे दरवाजे; अजून बरंच काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाच्या घोषणांवर भर दिला. सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून लोकांनी कोरोनाकाळात चांगलं काम उभं केल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

ग्रामीण बँकांकडून २९ हजार ५०० कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप करण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. देशातील १२, ००० स्वयंसहायता गटांनी करोडो मास्क आणि लाखो लिटर सॅनिटायझर कोरोना कालावधीत तयार केलं असल्याने या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं गरजेचं असल्याचं सीतारामन पुढे म्हणाल्या. दैनंदिन कामगारांना देण्यात येणारं दिवसाचं मानधन १८२ रुपयांवरून २०२ रुपयांवर नेण्यात आल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. १ लाख ८७ हजार ग्रामपंचायतीद्वारे २ कोटी ३३ लाख कामगारांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे काम देण्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

कोरोना संकटाच्या काळात सर्व गरजूंना शासनातर्फे ३ वेळ जेवण द्यायचा प्रयत्न झाल्याचं सीतारामन यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं. राज्यांतर्गत मजुरांना हालचाल करता यावी, त्यांच्या आरोग्यासंदर्भातही काम करता यावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं सीतारामन पुढे म्हणाल्या. जे कामगार घातक वातावरणाच्या ठिकाणी काम करतात त्या सर्वांना वाढीव ESI देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. मार्च आणि एप्रिल महिन्यात जवळपास ६३ लाख कर्जमंजुरी देण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. कामगार कायद्याचा वापर करुन कमीत कमी वेतनही सन्मानजनक असावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. कामगारांच्या आरोग्याविषयी सरकार सजग असून त्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येईल असंही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”