हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Agent) शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना काय व्हायचंय? असा प्रश्न विचारला तर त्यांना स्वतःला याचं नेमकं उत्तर ठाऊक नसतं. मोठमोठ्या पदांसाठी भरपूर अभ्यास, मेहनत आणि परीक्षा द्याव्या लागतात. ज्यामुळे अनेक विद्यार्थी मागे राहतात. तर मग अशा विद्यार्थ्यांनी नाराज होण्यापेक्षा LIC एजंट होण्याचा प्रयत्न करावा. कारण LIC अगदी सहजपणे एजंट होण्याची संधी देते. इतकंच काय तर LIC एजंट बनून चांगली मेहनत केल्यास लाखो रुपयांची कमाई अगदी सहज करता येते.
शिवाय एजंट होणं काही अवघड काम नाही. त्यामुळे मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हीही होऊ शकता LIC एजंट. जर तुम्ही हायस्कूल किंवा इंटर मीडिएटपर्यंत शिकला असाल तर तुम्ही आरामात LIC एजंट बनू शकता. आता ते कसं? हेच आपण जाणून घेणार आहोत. शिवाय आता LIC एजंट होण्यासाठी अर्ज करण्याचा मार्गदेखील सोपा करण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
LIC एजंट कसे व्हालं? (LIC Agent)
LIC एजंट होण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. यात ऑफलाईन साठी ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. यासाठी जवळच्या LIC ऑफिसमध्ये जाऊन विकास अधिकाऱ्याला भेटावे. इथे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो भरावा. फॉर्म सबमिशननंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावतील. ही मुलाखत LIC शाखा व्यवस्थापक घेतील. या मुलाखतीत पास झाल्यास तुमची तुमची निवड केली जाईल. याशिवाय तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करता येईल.
यासाठी LIC च्या वेबसाईटवर जा. ऑनलाईन फॉर्म भरा. त्यानंतर LIC कडून तुम्हाला फोन कॉल किंवा ई- मेल येईल. ज्यामध्ये पुढील प्रक्रिया आणि नियमांची माहिती दिली जाईल. (LIC Agent) LIC एजंट होण्यासाठी शाखा स्तरावर तुमची निवड झाल्यास त्यासाठी लागणारे तुमचे प्रशिक्षण सुरू केले जाते. ते पूर्ण करताच तुमची परीक्षा होते. ही परीक्षा पास झालात तर तुम्हाला एजंटचे प्रमाणपत्र दिले जाते आणि त्यानंतर तुम्ही LIC इन्शुरन्स विक्री सुरु करून कमाईची सुरुवात करू शकता.
LIC एजंट बनण्यासाठी लागणारी पात्रता आणि कागदपत्रे
LIC एजंट व्हायचे असेल तर त्यासाठी तुमचे शिक्षण दहावी पूर्ण किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज सादर करताना तुमचे वय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. (LIC Agent) अर्ज दाखल करताना तुमच्याकडे रहिवासी दाखला, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तसेच ६ पासपोर्ट साईझ आकाराचे फोटोदेखील असायला हवेत.
उत्तम LIC एजंटची लक्षणे
जेव्हा तुम्ही LIC एजंट म्हणून स्वतःची ओळख देता तेव्हा तुम्ही इतरांचे जीवन सुरक्षित करत आहात याची जाणीव असायला हवी. शिवाय अशा वेळी तुम्ही संवेदनशील असायला हवं. LIC एजंटने कायम आपल्या शब्दांवर आणि बोलण्यावर ठाम असायला हवे. तुमचा स्वभाव चांगला, सुस्वभावी आणि निर्मळ असायला हवा. (LIC Agent)
तसेच LIC एजंटने खोटे बोलणे आणि वाढवून चढवून सांगणे टाळावे. आपल्याकडे असलेले वाटाघाटीचे कौशल्य वापरून आपल्या धोरणाचे महत्व समोरील व्यक्तीला समजावून सांगावे. यामुळे समोरील व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेऊ शकेल आणि तुमच्या माध्यामातून आपले जीवन सुरक्षित करेल.
LIC एजंट होऊन किती कमावता येईल?
कोणत्याही LIC एजंटच्या कमाईचा मुख्य आधार म्हणजे विमा विक्रीतून मिळणारे कमिशन. जेव्हा तुम्ही विमा विरक्ती कराल तेव्हा तुम्हाला विम्याच्या प्रीमियम रकमेवर ३५ टक्क्यांपर्यंत कमिशन मिळते. शिवाय पॉलिसी जेवढी वर्षे टिकेल तेवढी वर्ष तुम्हाला कमिशन म्हणून रक्कम मिळेल. (LIC Agent)
LIC एजंट होण्याचे फायदे
LIC एजंट होण्याचे खूप फायदे आहेत. जसे की, LIC एजंटला LIC मधील कोणत्याही भरतीत प्रथम प्राधान्य दिले जाते. शिवाय व्याजमुक्त अॅडव्हान्स घेण्याची सुविधा मिळते. ज्यामुळे कोणतीही दुचाकी किंवा चारचाकी वाहने तो खरेदी करू शकतो. शिवाय आपले हक्काचे घर घेण्यासाठी सवलतीचे पैसेदेखील दिले जातात. सोबतच ग्रॅच्युईटीची सुविधा, कार्यालयीन भत्ता, प्रवास भत्ता, स्टेशनरी खर्चाची प्रतिपूर्ती, डायरी, कॅलेंडर, व्हिजिटिंग कार्ड ते लेटर पॅड आदींचा लाभ LIC एजंटला देण्यात येतो. (LIC Agent)