Foods for Estrogen | शरीरातील एस्ट्रोजनची पातळी नियंत्रित करण्यासाठी, आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Foods for Estrogen | मानवाच्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्स असतात त्या हार्मोन्सवर आपल्या शरीरातील अनेक क्रिया अवलंबून असतात. प्रत्येक हार्मोन हे त्याचे वेगवेगळे काम करत असते. शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी देखील शरीरातील हार्मोन्स खूप गरजेचे असतात. त्यापैकी महिलांमध्ये एस्ट्रोजन हा एक अत्यंत महत्त्वाचा हार्मोन आहे. हा हार्मोन महिलांच्या लैंगिक आणि पुनरुत्पादन आरोग्यासाठी महत्त्वाचे काम करतो. त्याशिवाय एस्ट्रोजन (Foods for Estrogen) हार्मोनमुळे कोलेस्टाईनची पातळी, रक्तातील साखरेची पातळी, हाडे आणि स्नायू कॉलेजन तयार करण्यासाठी त्याचप्रमाणे मेंदूचे कार्य सुरळीत करण्यासाठी एस्ट्रोजन महत्वाचे काम करते. त्यामुळे या हार्मोनची जर तुमच्या शरीरातील पातळी कमी झाली किंवा वाढली तर शरीरात अनेक समस्या निर्माण होतात.

महिलांच्या शरीरातील जर एस्ट्रोजनची पातळी नियंत्रणात नसेल, तर मासिक पाळी अनियमित होते. त्याचप्रमाणे मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होणे किंवा कमी रक्तस्त्राव होणे, अचानक वजन वाढणे, तणाव, मूड बदलणे यांसारख्या समस्या उद्भवतात. यासाठी अनेक महिला डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेत असतात. परंतु तुमच्या आहारात देखील तसा बदल झाला, तर तुमच्या शरीरातील एस्ट्रोजनची पातळी नियंत्रणात राहते. आज आपण अशा काही पदार्थांबद्दल माहिती घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील इस्ट्रोजनची पातळी नियंत्रणात राहते.

सोया | Foods for Estrogen

सोया दूध त्याचप्रमाणे सोया उत्पादनांमध्ये फायटोस्ट्रोजेन्स मुबलक प्रमाणात असतात. हा एक प्रकारचा एस्ट्रोजन आहे. तो वनस्पतीपासून मिळतो. याच्या सेवनाने तुमच्या एस्ट्रोजनची पातळी कमी झाली असेल तर ती भरून काढण्यास मदत होते.

बीन्स आणि मसूर

बीन्स आणि मसूरमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील एस्ट्रोजेनची पातळी कमी करण्यास मदत होते. जर तुमच्या शरीरातील एस्ट्रोजनची पातळी वाढली असेल, तर हा हार्मोन संतुलित करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

ओट्स

ओट्स, दलिया यांसारख्या धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतात. त्यामुळे ते महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजनचे पातळी संतुलित करण्यासाठी मदत करतात.

बिया

सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, अंबाडीच्या बियांमध्ये लिमोनिन जास्त प्रमाणात आढळते. ज्यामुळे आपल्या हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते.

सुकामेवा | Foods for Estrogen

बदाम, अक्रोड, पिस्ता यांसारख्या सुक्या मेव्यांमध्ये हेल्दी फॅट्स असतात. ज्यामुळे देखील आपल्या हार्मोनल इम्बॅलन्स होते

फळे

चेरी, संत्री, बेरी यांसारख्या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स नियंत्रित राहतात.

दूध उत्पादने

दूध उत्पादनांमध्ये दूध, दही, लोणी, पनीर या सगळ्या गोष्टी येतात. या दुग्धजन्य पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. या पदार्थांचा दररोज तुमच्या आहारात समावेश केला, तर तुमच्या शरीरातील एस्ट्रोजनची पातळी नक्कीच नियंत्रणात येईल.