Foods for Gut Health | उन्हाळ्यात पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी आजच आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Foods for Gut Health उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी नेहमीपेक्षा जास्त तापमान वाढलेले आहे. त्यामुळे सगळेजण स्वतःला थंड ठेवण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. अनेक लोक सहसा बाहेर गेल्यावर कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे यांसारखे पदार्थ खातात. जेणेकरून त्यांचे शरीर थंड राहील. परंतु या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत. यामध्ये असलेली साखर आणि प्रिझर्वेटिव्हमुळे आपल्या शरीराला मोठे नुकसान होते. यामुळे आपल्याला पचनाशी संबंधित आणि समस्या देखील निर्माण होतात. यामुळे भूक न लागणे, आम्लपित्त यांसारख्या समस्या निर्माण होतात. परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्या पोटाची तसेच पचनक्रियेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला उलट्या, जुलाब यांसारखे आजार होऊ शकतात. आज आपण या लेखांमध्ये उन्हाळ्यामध्ये तुमच्या जेवनात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. (Foods for Gut Health) मुळे तुमची पचनक्रिया खूप चांगली होईल. आणि तुमच्या पोटाला त्याचा काय फायदा होईल ते जाणून घेणार आहोत.

दहीभात

उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही दहीभात खाल्ला, तर तो पचायला देखील हलका असतो. आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील. यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. जे आपल्या आतड्याच्या मायक्रोबायोमला चालना देतात. त्यामुळे पचनसंस्थेसाठी दही खूप फायदेशीर आहे. त्याप्रमाणे हा पदार्थ अत्यंत हलका आणि पचायला सहज आहे.

पेठा रस | Foods for Gut Health

पेठेपासून फक्त भाजीच नाही, तर रस देखील बनवला जातो. हा रस उन्हाळ्यात खूप फायदेशीर असतो. तुमच्या शरीरातील पीएच पातळी नियंत्रित करण्यासाठी हा रस तुम्हाला मदत करतो. त्यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य देखील सुधारते. त्याचप्रमाणे ऍसिडिटी यांसारख्या समस्या असतील, तर त्या देखील दूर होतात. पेठेत फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचाही त्रास होत नाही.

हर्बल चहा

हर्बल चहा पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे तुमच्या पचनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. हर्बल टीमुळे तुम्हाला आरामही मिळतो. झोपण्यापूर्वी हर्बल चहा पिल्याने तुम्हाला चांगली झोप येते.

स्प्राऊट्स

स्प्राऊट्समध्ये फायबर जीवनसत्वे आणि वेगवेगळी खनिजे असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मुगाचे स्प्राऊट् नाष्ट्यामध्ये देखील खाल्ले जातात. त्यामुळे तुम्हाला ऊर्जा देखील मिळते. त्याचप्रमाणे स्प्राऊट्स प्रोटीनचा एक मोठा स्रोत आहेत.

कोशिंबीर

काकडी, टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर ही उन्हाळ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात पाणी असते. त्यामुळे हायड्रेशन मिळते आणि तुमचे पोट थंड राहते. त्याशिवाय तुमची पचनक्रिया देखील सुधारते.