Foods for Hemoglobin | हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिन्यात होईल फायदा

Foods for Hemoglobin
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Foods for Hemoglobin | दैनंदिन जीवनात कामाच्या व्यापामध्ये आपण बरेच वेळा आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्या शरीराला योग्य त्या गोष्टी पोहोचल्या नाही तर त्याचे परिणाम आपल्यावर होतात. आणि अशक्तपणा तसेच इतर आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. आपल्या शरीरात ऑक्सिजन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याची कामे लाल रक्तपेशी करतात.

हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तपेशींमध्ये आढळतात. ते आपला ऑक्सिजन क्षेत्रातील वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचवते. परंतु यामध्ये आपल्याला लोह असणे खूप गरजेचे असते. जर आपल्याला या रक्तात लोहाची कमी असली तर गर्भधारणा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होऊ शकते. आणि तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो.

असे झाले तर शरीराच्या प्रत्येक अवयापर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे थकवा अशक्तपणा चक्कर येणे, श्वास घेण्यात अडचणी यांसारख्या अनेक समस्या येतात. त्यामुळे आपल्या शरीरातील प्रमाण योग्य असणे खूप गरजेचे असते. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील गरजेचे आहे.

तसेच तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात खाद्यपदार्थात काही गोष्टी दूर ठेवल्या पाहिजे. तर हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी काही गोष्टी या आवर्जून खाल्ल्या पाहिजे. आता आपण जाणून घेऊयात अशा आहारात कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. त्यामुळे तुमच्या शरीराचे हिमोग्लोबिन हे प्रमाणात राहते.

पालक

हिरव्या भाज्यांमध्ये मुख्य लोह आणि फोलेट्स आढळतात. जे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. फोलेट हा एक प्रकारचा विटामिन बी आहे. जो हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी गरजेचा असतो. जर तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळा तरी पालक खात असाल तर त्याचे दोन्ही घटक तुमच्या शरीराला मिळतात आणि तुमचे हिमोग्लोबिन वाढण्यास त्याचा मदत होते.

डाळिंब | Foods for Hemoglobin

अनेकांना असे वाटते की डाळिंबाचा रंग लाल असल्यामुळे आपले रक्त वाढते. आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. परंतु असे काही नाही डाळिंबामध्ये जास्त प्रमाणात लोह आढळते. जे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी मदत करते. त्यामुळे आपण आठवड्यातून एकदा तरी डाळिंबाचे सेवन करणे गरजेचे असते.

स्ट्रॉबेरी

आपल्या शरीरात लोह शोषून घेण्यासाठी विटामिन सीची गरज असते. जर विटामिन सीची कमतरता असेल तर शरीर लोह योग्यरीत्या शोषणात सक्षम नसते. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. आणि स्ट्रॉबेरीमध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात आढळते आणि ते खाल्ल्याने तुम्हाला चांगला फायदा होतो.

केळी

केळीमध्ये लोह आणि फोलेट असतात ते हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी मदत करतात त्यामुळे केळी खाल्ल्याने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

बीटरूट

बीटरूटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आढळते. त्यामुळे जर तुम्ही दररोज देखील खात असाल तर त्यामुळे तुमचे हिमोग्लोबिन चांगले वाढते. त्यामध्ये फॉलिक ऍसिड आढळते जे हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते.