कास पठारावर जाताय? तर मग द्यावा लागणार ‘इतका’ प्रवेश शुल्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

जागतिक वारसा स्थळ अशी ओळख असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठाराची एक ख्याती आहे ती म्हणजे या परिसरातील सुमारे 350 पेक्षा जास्त जातीची फुले बहरतात. मात्र, वनविभागाच्या आडमुठे धोरणामुळे कास पठारावर आता धुके आणि पाऊस पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना 1 ऑगस्टपासून प्रत्येकी व्यक्ती 30 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहेत. खरंतर फुलांचा बहर नसताना केली जाणारी आकारणी म्हणजे पर्यटकांच्या खिशाला अनावश्यक कात्री म्हणावी लागणार आहे.

कास पठारावरील फुलांचा बहर हा फक्त सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो आणि हा बहर 45 दिवस टिकून राहतो. असे असताना आतापासूनच अशा पध्दतीने पर्यटकांना का त्रास दिला जात आहे? असा प्रश्न सातारकरांना पडला आहे. तर कास पठारावरील पावसाळी पर्यटन हंगाम येत्या एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळी पर्यटन हंगामात पठारावर पर्यटक गर्दी करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वन विभागाकडून प्रवेश शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीची एक संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कास पठार हे तेथील रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. कास पठारावर हजारो जातींची फुले आहेत. त्यातील अनेक जातींचे तर आपल्याला नावंही माहित नाहीत. पावसाळ्याच्या दिवसात विशेष: ऑगस्टनंतर हे पठार फुलांनी बहरून जाते. मोठ्या संख्येने पर्यटक कास पठाराला भेट देण्यासाठी येत असतात. आता अपर्यटकांना या ठिकाणी येताना प्रवेश शुल्क द्यावा लागणार आहे.

वनविभागाचा असा निर्णय

1) कास पुष्प पठारला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येकी व्यक्ती 30 रुपये सशुल्क हा 1 ऑगस्टपासून असेल. तोही शुल्क जाळीच्या आतमध्ये जाऊन फुले पाहणाऱ्यांसाठी असणार आहे.

2) पर्यटकांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने प्रवेश शुल्क स्वीकारला जाणार आहे.

3) 2 जीपच्या माध्यमातून कास पुष्प पठारावर परिसर दर्शन फेरी सुरु करण्यात येणारे आहे. त्यामध्ये कास पठार, कास तलाव, अंधारी, सह्याद्रीनगर, ऐकीव धबधबा ते परत कास, असा दर्शन फेरीचा मार्ग असणार आहे.