Form 26AS: या आर्थिक वर्षात दिलेल्या Income Tax ची Details अशाप्रकारे तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक वर्षात आपण भरलेला कर तपासणे महत्वाचे आहे. Form 26AS बघून आपण भरलेला कर तपासू शकता. या फॉर्ममध्ये, उत्पन्नामधून कट केला गेलेल्या टॅक्सची डिटेल्सची नोंद असते. तसेच, भरलेला सर्व टॅक्स आणि रिफंडची देखील माहिती असते. या फॉर्मद्वारे भरलेल्या टॅक्सची डिटेल्स, ऍडव्हान्स टॅक्स किंवा स्वयं मूल्यांकन कर देखील प्रदान केला जातो. यामुळे करदात्याची नियोक्ता कंपनी, बँक किंवा करदात्याने सरकारकडे टॅक्स जमा केला आहे की नाही याची माहिती मिळण्यास मदत होते. आपण आपला फॉर्म Form 26AS पुढील तीन मार्गांनी तपासू शकता-

1) ई-फाईलिंग पोर्टलवर लॉग इन करून

2) नेट बँकिंग खात्यातून

3) TRACES पोर्टल मार्फत

सर्व तीन पद्धतींद्वारे Form 26AS पहाण्यासाठी किंवा डाउनलोड करण्याच्या स्टेप्स-

1) ई-फाईलिंग पोर्टलवर लॉग इन करून

स्टेप 1: इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा

स्टेप 2: My Account वर जा

स्टेप 3: Form 26AS पहा (टॅक्स क्रेडिट)

स्टेप 4: ‘TDS Traces CPC website’ वर रिडायरेक्ट करण्यासाठी कंफर्म करा

स्टेप 5: ‘View Tax Credit Form 26AS’ वर क्लिक करा.

स्टेप 6: Assessment Year and Download Format सेलेक्ट करा

स्टेप 7: ‘View/ Dowenload’ वर क्लिक करा

2) नेट बँकिंग खात्यातून

स्टेप 1: नेट बँकिंग खात्यात लॉगिन करा

स्टेप 2: ‘Tax Credit (View Form 26AS) वर क्लिक करा

स्टेप 3: पॅन डिटेल्स कंफर्म करा

स्टेप 4: ‘Form 26AS’ वर क्लिक करा

3) TRACES पोर्टल मार्गे

स्टेप 1: www.tdscpc.gov.in वर जा आणि लॉग इन करा

स्टेप 2: आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स तयार करा आणि नवीन युझर म्हणून रजिस्ट्रेशन करा आणि करदात्यांची निवड करा

स्टेप 3: वरील तयार केलेल्या क्रेडेंशियलचा वापर करुन TRACES खात्यावर लॉग इन करा

स्टेप 4: लॉन इन डिटेल्स जोडा

स्टेप 5:’View your Form 26AS’ या टॅबवर क्लिक करा

स्टेप 6: ‘आपला Form 26AS पहा’ वर क्लिक करा

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment