मला आता आराम हवाय ; काँग्रेसचा ‘हा’ दिग्गज नेता राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मध्य प्रदेशात सरकार गमावल्यावर आणि पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठं विधान केलंय. छिंदवाडा येथील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना कमलनाथ यांनी राजकारणाला ‘रामराम’ करण्याचे संकेत दिले आहेत. जर अस झालं तर काँग्रेस साठी हा खूप मोठा धक्का असेल.

मला आता आराम करायचा आहे. मी आतापर्यंतच्या आयुष्यात भरपूर यश मिळवलं आहे, असं कमलनाथ म्हणाले आहे. कमलनाथ सध्या मध्यप्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. यासोबतच ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्कारावा लागल्यानंतर अनेक काँग्रेसमधील नेत्यांनी आणि आमदारांनी खुलेआम त्यांच्याविरोधात टीका केली. त्यामुळे कमलनाथ नाराज आहेत. म्हणूनच त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली होती. अखेरीस ज्येष्ठतेच्या मुद्द्यावरुन कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. काही काळाने ज्योतिरादित्य यांनी भाजपची वाट धरली आणि काँग्रेसला रामराम ठोकला. ज्योतिरादित्य यांच्या जाण्याने मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता गेली. ज्योतिरादित्य समर्थक आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि कमलनाथ सरकार पडलं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment