माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे. यानुसार पृथ्वीराज चव्हाण गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर पुढील 4 दिवस असणार आहेत. येथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मिटिंग घेऊन संवाद साधणार आहेत. तसेच या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदा सुद्धा होणार आहेत. आज अहमदाबाद काँग्रेस कमिटी मध्ये पोहचल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात आदरांजली अर्पण केली.

गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने प्रचाराची रणनीती आखली असून मागील निवडणुकीत सत्ताधारी भाजप ला काँग्रेस ने चांगलीच टक्कर दिली होती. यावेळच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस ने कंबर कसली असून गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी काँग्रेसने महत्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे त्यानुसार महाराष्ट्रातून काँग्रेस ने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि खा. मुकुल वासनिक यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

गुजरात काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तमरित्या जबाबदारी याआधी निभावली आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने 2004 साली गुजरात मध्ये 12 खासदार निवडून आणले आहेत. त्याच वर्षी या निर्णायक गुजरात च्या खासदारांच्या संख्येमुळे काँग्रेस हा लोकसभेत 1 नं चा पक्ष ठरला होता आणि काँग्रेस पक्ष मित्र पक्षांच्या साहाय्याने सत्तेवर आला होता. हि महत्वाची घटना काँग्रेस मुख्यालयात नोंद असल्याने यावर्षीच्या गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रमुख विभागांची जबाबदारी दिलेली आहे.