माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. बिशन सिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर येथे झाला होता. त्यांनी 1966 ते 1979 कालावधीत भारतासाठी तब्बल 67 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच, 266 विकेट घेतल्या होत्या. बिशनसिंह यांनी एकूण 22 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले आहे.

सर्वात प्रथम बिशन सिंह बेदी यांनी पंजाब संघाकडून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर ते 1968 मध्ये दिल्ली रणजी संघात सामील झाले. अनेक वर्षे ते याच संघाचा भाग होते. पुढे जाऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पदार्पण केले. बिशन सिंह बेदी हे सुमारे 12 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले. क्रिकेटमधील महान फिरकी गोलंदाज अशी बिशन सिंह बेदी यांची ओळख होती.

इतकेच नव्हे तर, 1970 च्या शतकात स्पिन गोलंदाजीसाठी बिशन सिंह बेदी प्रसिद्ध होते. त्यांनी 22 टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदार सांभाळली. ज्यामुळे त्यांची भारतीय टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पिनर्समध्ये गणना केली जात होती. आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी 273 बळी घेतले होते. अशा पध्दतीने बिशन सिंह बेदी यांचे मोठे योगदान भारतीय क्रिकेटविश्वाला लाभले आहे. आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेटविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.