हार्दिक पंड्यामुळे मुंबईचा पराभव?? माजी क्रिकेटपटूंनी चांगलंच झापलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सनरायजर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात (SRH Vs MI) मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा टीकेचा धनी बनला आहे. मुंबई विरुद्ध हैद्राबाद च्या फलंदाजांनी तब्बल २७७ धावा काढत एक नवा विश्वविक्रम केला. त्यानंतर मुंबईने शर्थीचे प्रयत्न करून २४६ धावा काढल्या, मात्र विजयासाठी मुंबईला ३१ धावा कमीच पडल्या. यावरून माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी हार्दिकच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) टॉस जिंकूनप्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीपासूनच ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा एडन मार्करम आणि शेवटी हेन्री क्लासेनने मुंबईच्या गोलंदाजांच्या पिटाई केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह हा एकमेव गोलंदाज होता ज्याने जास्त धावा दिल्या नाहीत. मात्र हार्दिकने ज्याप्रमाणे बुमराहचा वापर केला त्यावरून त्याच्यावर टीका केली जात आहे. कारण बुमराहला पॉवर प्लेमध्ये केवळ एक ओव्हर देण्यात आली. त्यानंतर जसप्रीत बुमराह थेट 12 व्या ओव्हरमध्येच बॉलिंगला आला. तोपर्यंत हैदराबादच्या 160 धावा झालेल्या होत्या. यावरून इरफान पठाणने ट्विट कर हार्दिकवर निशाणा साधला आहे.

मुंबईच्या इतर गोलदांजांना मार पडत असताना हार्दिक पांड्यानं जसप्रीत बुमराहला लवकर गोलंदाजी नं देणं समजण्यापालीकडील आहे, असं इरफान पठाण म्हणाला. याशिवाय हार्दिकच्या बॅटिंगवर देखील इरफान पठाणनं प्रश्न उपस्थित केले आहेत. टीमचे इतर बॅटसमन 200 च्या स्ट्राइक रेटनं धावा करत असताना कॅप्टनचं स्ट्राइक रेट 120 असू शकत नाही, असं इरफान म्हणाला.

दुसरीकडे इरफानचा भाऊ युसुफ पठाणने सुद्धा हार्दिक पंड्यावर हल्लाबोल केला आहे. सनरायजर्स हैदराबादनं 11 ओव्हर्समध्ये 160 हून अधिक धावा केल्या असताना हार्दिक पांड्यानं जसप्रीत बुमराहला एकच ओव्हर का दिली? तुमच्या बेस्ट बॉलरनं अशावेळी बॉलिंग करणं आवश्यक आहे. हा बॅड कॅप्टनसीचा प्रकार आहे असं युसूफने म्हंटल.