कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची वहीतुला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त कराड नगरपरिषद केंद्र शाळा नंबर 3 येथे वही तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्षा संगीता देसाई व बापू देसाई मित्र परिवारातर्फे वहीतुला करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या वह्यांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

यावेळी राजेंद्रसिंह यादव व त्यांच्या सुविंद्य पत्नी रूग्वेदिका राजेंद्रसिंह यादव यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक हणमंतराव पवार विजय वाटेगावकर, नगरसेविका स्मिता हुलवान, नगरसेवक किरण पाटील, निशान ढेकळे, ओमकार मुळे, राहुल खराडे, मुख्याध्यापक अर्जुन कोळी, सुधीर एकांडे, सचिन पाटील, जयंत गुजर, शशीराज करपे, अक्षय गवळी, ऋषिकेश कुंभार तसेच शाळा नंबर 3 मधील सर्व शिक्षक, शिक्षिका व कराड शहर गब्बर ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, वाढदिवस साजरा करणे हे एक सामाजिक कार्य करण्याचे निमित्त आहे. या वाढदिवसानिमित्त बापू देसाई मित्र परिवाराने काैतुकास्पद असा कार्यक्रम घेतला. आजची पिढी घडण्यासाठी शिक्षण महत्वाचे असते. त्यासाठी वहीतुला करून गरीब व गरजूंना वह्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येकाने अशाच पध्दतीने सामाजिक कार्य करत राहिले तर शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही. यावेळी प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले. आभार विजयसिंह यादव यांनी मानले.