माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Patil) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत कामानिमित्त गेले असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर त्यांना तातडीनं आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार प्रक्रिया सुरू आहे.

आरएमएल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच ते यातून बरे होतील. तसेच जास्त काळजी करण्याचे कारण नाही. असे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव हे त्यांच्या कामानिमित्त नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले होते. याचवेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्वरीत सुरक्षा रक्षकांनी त्यांना रुग्णालयात हलवले.

मुख्य म्हणजे, हर्षवर्धन जाधव हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपल्या प्रकृतीची माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली. यावेळी त्यांनी, “नितीन गडकरी यांच्या घरी असताना मला हृदयविकाराचा झटका आला. आता मला रुग्णालयात घेऊन जात आहेत. या आधी माझी अँजियोप्लास्टी झालेली आहे. भारत माता की जय, देशाची, महाराष्ट्राची काळजी घ्या. कन्नड मतदारसंघाची काळजी घ्या. वाचलो तर पुन्हा भेटू” असे आवाहन केले.

हर्षवर्धन जाधव यांनी मनसे, शिवसेना या पक्षांसोबत काम केल्यानंतर त्यांनी आता तेलंगाणातील के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर आज काही कामानिमित्त ते नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. यानंतरच त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून पुढील उपचार प्रक्रिया सुरू आहे.