औरंगाबाद – वैजापूरचे नगराध्यक्ष ते तीन वेळा आमदार राहिलेले आर. एम. वाणी यांचे दुखःद निधन झाले. वाणी यांनी महाराष्ट्र विधानसभेत असताना अनेक जनकल्यानाचे प्रश्न सभागृहात मांडले होते. माजी आमदार वाणी यांचे मंगळवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
त्यांनी एक अभ्यासू पत्रकार संपादक अशी देखील आपली ओळख निर्माण केली होती. वाणी यांचे पार्थिव बुधवार सकाळी साडेदहा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी येवला रोडवरील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. अंतिमयात्रा निवासस्थानाहून येवला रोड – डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा – संकट मोचन हनुमान मंदिर – टिळक रोड – जामा मस्जीद – पाटील गल्ली मार्गे व अंत्यविधी वैजापुर अमरधाम येथे सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे.
माजी आमदार वाणी यांच्या निधनामुळे जनकल्याण प्रश्नांची जाण असणारा नेता गमावला असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटत आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.




