माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. परंतु अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्रतिभाताई पाटील यांचे वय 89 वर्ष इतके आहे. त्यांनी 2007 ते 2012 दरम्यान राष्ट्रपतीपद भूषवले. आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

सांगितले जात आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती. परंतु बुधवारी त्यांना जास्तच अस्वस्थ वाटू लागले. यामुळेच कुटुंबाने त्यांना तातडीने उपचारासाठी भारती रुग्णालयात हलवले. आता त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. दरम्यान, प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तर देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध खात्यांमध्ये मंत्रीपद सांभाळले. विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी एस.टी. महामंडळाचे अध्यक्षपदाची धुराही सांभाळलेली होती.

प्रतिभाताई पाटील या 1991 साली अमरावतीमधून लोकसभा सदस्य झाल्या होत्या. त्यांनी, आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण सांस्कृतिक, इतकेच नव्हे तर, सार्वजनिक आरोग्य समाजकल्याण, दारूबंदी पुनर्वसन, शिक्षणमंत्री अशा विविध खात्यांमध्ये मंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. पुढे त्यांनी राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून म्हणूनही काम पाहिले. यानंतर त्या राष्ट्रपती झाल्यावर भारताच्या हितासंबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.