RBI चे माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. याबाबतची माहिती बिझनेस लाईनने दिली आहे. एस व्यंकटरामनन हे RBI चे 18 वे गव्हर्नर होते. त्यांनी 1990 ते 1992 या काळात RBI मध्ये गव्हर्नर पदाची जबाबदारी सांभाळली होती.

यापूर्वी एस व्यंकटरामनन हे 1985 ते 1989 सालात अर्थ मंत्रालयामध्ये सचिव पदाची जबाबदारी सांभाळत होते. पुढे जाऊन त्यांच्याकडे RBI ने गव्हर्नर पदाची सूत्रे दिली. एस व्यंकटरामनन हे गव्हर्नर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तसेच त्यांनी आपल्या कारकीर्दीत राज्य आणि केंद्र सरकारमध्ये देखील महत्वाची पदे सांभाळली. गव्हर्नर सेवेतून निवृत्त झाल्यानंतर व्यंकटरामनन हे शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे काम करत होते. परंतु गेल्या काही काळापासून प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान, एस वेंकटरामनन यांचा जन्म 1931 मध्ये नागरकोइल येथे झाला. जो त्यावेळच्या त्रावणकोर संस्थानाचा एक भाग होता. त्यांनी देशाच्या मध्यवर्ती बँकेची धूरा अशा काळात हातात घेतली होती, ज्यावेळी देशाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परंतु या सर्व संकटांना सामोरे जात वेंकटरामनन आपली जबाबदारी पार पाडत राहिले. आज याच एस वेंकटरामनन यांनी जगाचा निरोप घेतला आहे.