चालकाचा ताबा सुटला : मलकापूर हद्दीत चारचाकी गाडीचा अपघात ; तिघेजण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील मलकापूर हद्दीत पुणे-बंगळूर महामार्गावर नटराज टॉकीज हद्दीत चालकाचा गाडी चालवताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात झाला. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून यात तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात गाडीमधील चालक सागर वसंत शिंदे (वय 30), भरत अनुते (वय 38) कृष्णा काशिनाथ कगदे (वय 38) (तिघेही रा. कासारवाडी पिंपरी, जिल्हा पुणे) हे जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील मलकापूर येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नटराज टॉकीज परिसरात सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून पुणेच्या दिशेने पिकअप गाडी (क्रमांक एमएच १४ ईएम ५८४५) वरील चालक सागर वसंत शिंदे (वय 30, रा. कासारवाडी, पिंपरी पुणे) हे जात असताना मलकापूर हद्दीत आले. यावेळी चालक सागर वसंत शिंदे यांचा डोळा लागल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर त्यांची गाडी नटराज टॉकीज हद्दीत असलेल्या महामार्गालगतच्या सुरक्षा रेलिंगला धडकली. गाडीचा वेग इतका होता कि, गाडीने सुरक्षा रेलिंग तोडून त्यापलीकडील नाल्यात गाडी गेली.

या अपघातात गाडीमधील चालक सागर वसंत शिंदे (वय 30), भरत अनुते (वय 38) कृष्णा काशिनाथ कगदे (वय 38) (तिघेही रा. कासारवाडी पिंपरी, जिल्हा पुणे) हे जखमी झाले. या अपघातानंतर तात्काळ नागरिकांनी तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातानंतर महामार्ग मदत विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, तानाजी जाधव, चंद्रकांत जवळगेकर, सुदेश दरडा दादा सावंत यांनी घटनस्थळी धाव घेतली. तसेच जेसीबीच्या साह्याने अपघात स्थळावरून गाडी बाजूला काढली.

Leave a Comment