सुवर्ण ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेकडून फसवणूक : सभासद, ठेवीदारांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सुवर्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी फसवणूक करून दमदाटी करत असल्यामुळे खातेदार आणि सभासद 2 ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषण करणार आहेत. सुवर्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनगाव तर्फ सातारा जिल्हा सातारा पतसंस्था बंद असल्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. ठेवीदार, सभासद, खातेदार सुवर्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनगाव ही पतसंस्था गेले तीन वर्ष बंद असल्याबाबत आज सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपल्या सर्व व्यथा सांगत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक व तालुका सहाय्यक निबंध यांनाही आजच निवेदन देऊन कळवण्यात आले आहे.

सुवर्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक आणि सचिव हे ठेवीदार व खातेदार यांना दमदाटीची भाषा करत आहेत. सर्व तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहे. संस्थेचे सचिव ठेवीदारांना पैसे देतो म्हणून ठेव पावती घेत आहेत. पुन्हा ठेव पावती देत नाहीत व पैसेही देत नाहीत, असा गंभीर आरोप पतसंस्थेवर आणि संस्थेचे पदाधिकाऱ्यांवर ठेवेदार यांनी केला आहे.

संस्थेचे पदाधिकारी ठेवीदार व खातेदारांना केलेली तक्रार मागे घ्या नाहीतर, आम्ही आमच्या जीवाचे बर वाईट करून घेऊन तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून तुम्हाला पोलिसात अडकवू अशी धमकी करत आहेत. या धमक्यांना आणि दमदाटीला कंटाळून संस्थेच्या सभासदांनी आणि खातेदारांनी 2 ऑक्टोंबर 2022 रोजी गांधी जयंती निमित्त आमरण उपोषण सोनगाव तर्फ सातारा येथे करणार आहेत. तरी आमच्या जीवितहानी संबंधित अधिकारी जबाबदार असतील असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले आहे.