Work From Home च्या नावाखाली 6 लाखांना गंडा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक | भारतात कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होमची मागणी वाढताना दिसत आहे. परंतु याच वर्क फ्रॉम आमच्या नावाखाली आता फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. नाशिक शहरात वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणि पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून तब्बल साडे 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका चांगल्या जॉबची ऑफर देऊन तसेच चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी (Cyber Crime) एका तरुणाची फसवणूक केली आहे.

वर्क फ्रॉम होमचे दाखवले आमिष

याप्रकरणी (Nashik) नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रविना रमेश गोडसे यांच्या तक्रारीनंतर पोलीस या सायबर भामट्यांचा शोध घेत आहेत. रमेशने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात प्रथम या सायबर भामट्यांनी रमेश यांना वर्क फ्रॉम होम जॉबच्या माध्यमातून जास्त पैसे मिळवून देण्याचे आम्ही दाखवले. तसेच ऑफिसचे कामकाज ऑनलाईन माध्यमातून दाखवत रमेश यांना वेगवेगळ्या बँक खात्यावरून साडे सहा लाख रुपये शुल्क भरण्यास सांगितले. हे पैसे घेतल्यानंतर या भामट्यांशी रमेश कोणताही संपर्क करु शकले नाही. यातूनच आपली फसवणूक झाल्याचे रमेश यांच्या लक्षात आले.

तब्बल 6 लाख रुपयांची फसवणूक

या सर्व घटनेनंतर रमेश यांनी त्वरित सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. गेल्या २ ते ४ मे दरम्यान त्यांची ६ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. यापूर्वी देखील वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली अनेक तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. गेल्या मार्च महिन्यात नाशिकमध्येच लोकेश रविकांत दीक्षित यांची ऑनलाईन वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली होती. यानंतर त्यांनी त्वरीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

लोकेश रविकांत दीक्षित यांच्याकडून या सायबर भामट्यांनी तब्बल ३ लाख १९ हजार घेतले होते. त्यांच्याकडून देखील वेगवेगळ्या बँक खात्यावरून पैसे मागवण्यात आले होते. परंतु पैसे मिळाल्यानंतर या भामट्यांनी लोकेशन यांच्याशी कसलाही संबंध ठेवला नाही. आता या प्रकरणात पोलिसांनी ज्या खाते धारकांच्या नावावर पैसे टाकण्यात आले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.